मुंबई प्रतिनिधी - मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक महिन्यापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अद
मुंबई प्रतिनिधी – मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक महिन्यापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी जामिनीसाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
सध्या मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार याची उत्सुकताही होती पण आजही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या अटकेचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून करण्यात आला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील मालमत्तेच्या प्रकरणी दाऊद इब्राहिम आणि 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी असलेल्या सरदार खानसोबत बैठका केल्याचा दावा एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात केला होता. विशेष न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेत मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील कारवाई करण्यास मान्यता दिली होती.
COMMENTS