मुंबई ः वैद्यकीय कारणास्तव माजी मंत्री नवाब मलिक जामिनावर आहेत. शुक्रवारी त्यांच्या जामिनाची मुदत संपली असून, त्यांना पुन्हा अटक करण्यात येते की,
मुंबई ः वैद्यकीय कारणास्तव माजी मंत्री नवाब मलिक जामिनावर आहेत. शुक्रवारी त्यांच्या जामिनाची मुदत संपली असून, त्यांना पुन्हा अटक करण्यात येते की, त्यांचा जामीन पुन्हा वाढवण्यात येतो, यावर चर्चा सुरू असतांनाच त्यांच्या जामिनात दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्या जामिनाचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या जामीनामध्ये दोन आठवड्यांसाठी वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून ईडीच्या वाकिलांना न्यायालयामध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्याने जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे अंतरिम जामीन त्याचा दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला. शुक्रवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी नवाब मलिक विधानभवनात पोहोचले. यानंतर एक आठवड्यापूर्वी सहा महिन्यांनी नवाब मलिक पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बैठकीत सहभागी झाले होते. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मतदान देखील केले.
COMMENTS