Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात

राहुरी ः शहरातील बाजारपेठेतील जैन स्थानकाजवळ सरस्वती महिला नवरात्र उत्सव मंडळाने यावर्षीही दिमाखात नवरात्र उत्सव साजरा करत उत्सवाची परंपरा कायम र

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
छत्रपती संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले -आ शंकरराव गडाख
राहुरी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाशशेठ पारख

राहुरी ः शहरातील बाजारपेठेतील जैन स्थानकाजवळ सरस्वती महिला नवरात्र उत्सव मंडळाने यावर्षीही दिमाखात नवरात्र उत्सव साजरा करत उत्सवाची परंपरा कायम राखली. बारा वर्षांपूर्वी जैन स्थानकाजवळ सरस्वती महिला बचत गटाच्या महिलांनी या नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना केलेली आहे. सरस्वती मातेची साडेतीन फूट सुबक मूर्ती दरवर्षी नवरात्र उत्सव काळात स्थापन केली जाते. महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रम देखील केले जातात. या परिसरातील भाविक भक्तांकडून गणेश उत्सव मंडळ स्थापन करून दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी नवरात्र उत्सव काळात दररोज देवीला त्या त्या दिवसांच्या रंगांची आकर्षक अशी वस्त्रे परिधान करण्यात आली. या उत्सव मंडळामध्ये जैन स्थानक परिसरातील चुत्तर, सुराणा, बिहाणी, जोशी, गाढे, मैड, प्रधान, नहार, ओझा, भागवत, भांड आदी परिवारातील महिला सदस्या सहभागी झाले आहेत.

COMMENTS