Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र राडा प्रकरणी नवनाथ शिराळे यांना अटकपूर्व जामीन

बीड प्रतिनिधी - दि.11 एप्रिल रोजी बँक ऑफ महाराष्ट्र साठे चौक बीड येथील डेप्युटी मॅनेजर याला मारहाण  तसेच सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी भाजपा

इथे सर्वांचीच घरे काचेची, एकमेकांवर दगडे फेकू नका | LOKNews24
दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान
दारूच्या नशेत थेट ट्रेनच्या इंजिन खाली जाऊन झोपला व्यक्ती l LOKNews24

बीड प्रतिनिधी – दि.11 एप्रिल रोजी बँक ऑफ महाराष्ट्र साठे चौक बीड येथील डेप्युटी मॅनेजर याला मारहाण  तसेच सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी भाजपा जिल्हा सचिव तथा माजी न.प.सभापती नवनाथ शिराळे यांच्यासह इतर तिघांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुरनं 86/2023 भादंवि कलम 353, 323,504,34 प्रमाणे शासकीय कामात अडथळा व लाथाबुक्क्याने मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या दरम्यान नवनाथ शिराळे यांनी बँकेत येवून त्यांच्या खात्याचा खाते उतारा मागितला असता डेप्युटी मॅनेजरने त्यांना ईमेल आयडी मागीतला त्यावर शिराळे यांनी मराठीमध्ये दिला, मात्र इंग्रजीमध्ये ईमेल आयडी द्या, मराठीत चालत नाही असे डेप्युटी मॅनेजर यांनी सांगितले. त्यावर नवनाथ शिराळे यांनी त्यांच्या मुलास फोन करुन डेप्युटी मॅनेजर यांना ईमेल आयडी इंग्रजीमध्ये देणे बाबत सांगून डेप्युटी मॅनेजर यांना बोलण्यास सांगितले असता त्यांनी फोन झटकून टाकला. याचा राग शिराळे यांना आला असता त्यांनी संबंधितास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्यांच्या सोबतचे तिघे जण पाठीमागून आले व लाथा बुक्क्याने मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशी तक्रार डेप्युटी मॅनेजर यांनी बीड शहर पोलीस ठाणे येथे दिली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते नवनाथ शिराळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दि.19 एप्रिल रोजी अ‍ॅड. डी.जी. हांगे व अ‍ॅड.गोविंद शिराळे यांच्या मार्फत फौजदारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात अ‍ॅड.डी.जी. हांगे व अ‍ॅड.गोविंद शिराळे यांनी मांडलेला पुरावा, भक्कम बाजु तसेच आरोपीच्यावतीने केलेला बचाव तथा सदर फिर्यादी डेप्युटी मॅनेजर बँकेतील कर्मचारी शिंदे, उबाळे व मॅनेजर कांबळे यांच्या विरुध्द दि. 11 एप्रिल रोजी केलेली तक्रार बीड शहर पोलीस स्टेशन येथील फिर्याद एन.सी.आर. क्र.64/2023 भादंवि कलम 323, 506, 34 प्रमाणे दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्याय निवाडे तसेच आरोपीच्यावतीने केलेला योग्य असा बचाव ग्राह्य धरुन मा.जिल्हा व सत्र न्यायाधिश सो.बीड यांनी आरोपीचा जामीन अर्ज दि. 27 एप्रिल रोजी तुर्तातुर्त मंजूर केला होता व अटकपूर्व सशर्त जामीन अर्ज दि.2 मे 2023 रोजी मंजूर केला. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. दिनेश हांगे व अ‍ॅड.गोविंद शिराळे यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड.गीता वझे-बहिरे, अ‍ॅड.सचिन तांदळे, अ‍ॅड.उत्तरेश्वर काचमांडे, अ‍ॅड.पंकज रायभोळे, अ‍ॅड.दिनेश नाटकर, अ‍ॅड.मीरा सवाई,अ‍ॅड.एस.बी.शेख, अ‍ॅड.पी.बी.मिसाळ, अ‍ॅड.सोनम शिराळे यांनी विशेष सहकार्य केले. सदर प्रकरणाकडे बीड शहरासह जिल्हाभरातील नागरीकांचे लक्ष लागले होते.

COMMENTS