Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऍड.एम.एन. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र 

अकोले : राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ऍड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दि.१३ व १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या राष्ट्रीय सेमिनार चे उद्घाटन बेळगाव (कर्नाटक )येथील शासकीय महाविद्यालयातील वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.विद्या जिरागे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे ( रुसा) माजी सदस्य व कन्सल्टंट डॉ.प्रमोद पाब्रेकर, सत्यनिकेत संस्थेचे संचालक एस.टी.येलमामे यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाले.  या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.टी.येलमामे हे होते.या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक करून प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला.तसेच राष्ट्रीय सेमिनार आयोजना मागील हेतू स्पष्ट केला. यावेळी संशोधन पेपर अंकाचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.” उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास ” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी साधन व्यक्ती म्हणून  डॉ.विद्या जिरागे (बेळगाव,  कर्नाटक), डॉ.प्रमोद पाब्रेकर,(वरिष्ठ सल्लागार, रूसा,महाराष्ट्र राज्य) डॉ.अशोक पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर)डॉ. सोमनाथ गंडाळ( केंद्रीय शासकीय विद्यापीठ राजस्थान), डॉ.बाळासाहेब सराटे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मराठवाडा,विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) डॉ.बापू थोरात (छत्रपतीसंभाजीनगर), अजय देशमुख ( महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष, अमरावती) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख  मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.” या राष्ट्रीय सेमिनार मधून नवीन माहिती मिळाली यामुळे भावी काळात त्याचा निश्चितच फायदा होणार आहे “अशी प्रतिक्रिया सहभागी प्रतिनिधी संशोधक विद्यार्थी डूबे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.पी.टी.करंडे, प्रा.  योगिता वाकचौरे, प्रा.जी.एस.कुुसमुडे यांनी केले. 

मुतखेल आश्रम शाळेत विज्ञान दिन उत्साहात
ध्येय गाठण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा : आभाळे
अकोले तहसीलमध्ये मंगळवारी ग्राहक दिनाचे आयोजन

अकोले : राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ऍड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दि.१३ व १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या राष्ट्रीय सेमिनार चे उद्घाटन बेळगाव (कर्नाटक )येथील शासकीय महाविद्यालयातील वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.विद्या जिरागे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानचे ( रुसा) माजी सदस्य व कन्सल्टंट डॉ.प्रमोद पाब्रेकर, सत्यनिकेत संस्थेचे संचालक एस.टी.येलमामे यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाले.

 या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.टी.येलमामे हे होते.या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक करून प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला.तसेच राष्ट्रीय सेमिनार आयोजना मागील हेतू स्पष्ट केला. यावेळी संशोधन पेपर अंकाचे अनावरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.” उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास ” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी साधन व्यक्ती म्हणून  डॉ.विद्या जिरागे (बेळगाव,  कर्नाटक), डॉ.प्रमोद पाब्रेकर,(वरिष्ठ सल्लागार, रूसा,महाराष्ट्र राज्य) डॉ.अशोक पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर)डॉ. सोमनाथ गंडाळ( केंद्रीय शासकीय विद्यापीठ राजस्थान), डॉ.बाळासाहेब सराटे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर,मराठवाडा,विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) डॉ.बापू थोरात (छत्रपतीसंभाजीनगर), अजय देशमुख ( महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना अध्यक्ष, अमरावती) आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख  मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.” या राष्ट्रीय सेमिनार मधून नवीन माहिती मिळाली यामुळे भावी काळात त्याचा निश्चितच फायदा होणार आहे “अशी प्रतिक्रिया सहभागी प्रतिनिधी संशोधक विद्यार्थी डूबे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.पी.टी.करंडे, प्रा.  योगिता वाकचौरे, प्रा.जी.एस.कुुसमुडे यांनी केले. 

COMMENTS