Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे प्रयोगशील शिक्षण ः डॉ. पराग काळकर

लोणी ः कालपर्यंतची शिक्षण पद्धती ही एका बंदिस्त चौकटीत होती परंतु आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं ही चौकट मोडून चौकटी बाहेरचे शिक्षण विद्यार्थ्यां

*VIRAL सत्य की असत्य : 5G टॉवरसाठी देशात Corona आणि Lockdown चे नाटक ? काय आहे सरकारची खेळी ? | LokNews24*
नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल
मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू

लोणी ः कालपर्यंतची शिक्षण पद्धती ही एका बंदिस्त चौकटीत होती परंतु आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं ही चौकट मोडून चौकटी बाहेरचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे या संदर्भातले सर्व दरवाजे खुले करून विद्यार्थ्यांना एका शाखेतले शिक्षण घेत असताना दुसर्‍याही विद्याशाखेतले विषय शिकण्याची संधी या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य ,महाविद्यालये आणि विद्यापीठे या सर्वांना हे बदल स्वीकारून आणि अभ्यास मंडळांनाही त्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करून या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाण्याची गरज आहे असे प्रतिपिदन साविञीबाई फुले  पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी केले.       

केंद्र सरकारने 2020 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू होत आहे. या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयीन प्राचार्य आणि संचालक यांची एक दिवसीय कार्यशाळा लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केली होती यावेळी उपकुलगुरु डॉ. पराग काळकर बोलत होते. यावेळी  वाणिज्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर  देसाई, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. संजय ढोले,संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदिप दिघे, कॅम्प संचालक डॉ. आर.ए.पवार, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अनिल वाबळे सहसमन्वयक डॉ. अनिल लांडगे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ.शांताराम चौधरी आदीसह संस्था प्रमुख, प्राचार्य उपस्थित होते.

    डॉ.पराग यांनी   ाष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे याविषयी उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले.काळकर यांनी आपल्या विवेचनामधून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणते बदल झालेले आहे हे सांगत असतानाच विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना, प्राचार्यांना, संस्थाचालकांना, महाविद्यालयांना व विद्यापीठांना हे सगळे बदल स्वीकारून नवीन बदलांना सामोरे जावे लागणार आहे. महाविद्यालयीन प्राचार्यांसमोर क्रेडिट पद्धत अर्थात श्रेयांक पद्धत कशी असणार आहे, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य कसे असणार आहे त्याचबरोबर आंतरविद्याशाखा ही कशा पद्धतीने निवडता येणार आहे.याविषयी मार्गदर्शन केले.

वाणिज्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.यशोधन मिठारे यांनी वाणिज्य विद्या शाखेतील अभ्यासक्रमाचे स्वरूप वाणिज्य विद्या शाखेने तयार केलेल्या अभ्यासक्रम याची सविस्तर माहिती  दिली तर आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई यांनी मानव्यविज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणारे विषय त्या विषयांची तयार केलेली बास्केट इतर विद्याशाखेतून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि एकूणच श्रेयांक पद्धत याविषयीचे विवेचन करतानाच मानव्यविज्ञान शाखेंतर्गतले विषय आता सायन्स, कॉमर्स, संगणकशास्त्र या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनाही अभ्यासता येतील याविषयीचे विवेचन त्यांनी केले. तर डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या विवेचनामधून सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील विषय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कसे आहेत याविषयीचे उदाहरणांसह विवेचन केले या कार्यशाळेचा समारोप विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले यांच्या मार्गदर्शनाने झाला. कार्यशाळेच्या माध्यमातून महाविद्यालयीन प्राध्यापक व अहमदनगर ग्रामीण मधील सर्व प्राचार्य यांना निश्‍चितच फायदा होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेण्यासाठी मदत होईल असा आत्मविश्‍वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे यांनी व्यक्त केला.

COMMENTS