Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक शिक्षक मतदार संघ 93.48 टक्के ; कोपरगाव तालुक्यात 93.58 टक्के मतदान

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघा करिता आज बुधवार दि 26 जून रोजी नाशिक विभागीय मतदार संघातील नाशिक, अहमदनगर

कोपरगावकरानो आता तरी बदला- देसले
गुळवे हे माणुसकीचे असल्यामुळेच सर्वाधिक उसाचे गाळप
वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने पोलिसांच्या रडारवर ; शहर वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघा करिता आज बुधवार दि 26 जून रोजी नाशिक विभागीय मतदार संघातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यातील 54 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मतदारसंघाकरीता मतदान प्रक्रिया संपन्न झाली.
या निवडणुकीत 21 उमेदवार रिंगणात असून यात महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे ड. संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ड. महेंद्र भावसार तर कोपरगाव भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यातच खरी लढत लढत झाली असून पाच जिल्ह्यात 46503 पुरुष तर 22865 स्त्री मतदार असे एकूण 69 हजार 368 मतदार असून  संध्याकाळ पर्यंत दिवस अखेर 64846 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत 93.48 टक्के इतके मतदान झाले आहे तर तब्बल 4522 शिक्षक मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ

नंदुरबार
एकूण मतदान-5393
झालेले मतदान-5184
टक्केवारी-96.12%
मतदान न केलेले शिक्षक मतदार-209

धुळे
एकूण मतदान-8159
झालेले मतदान-7651
टक्केवारी-93.77%
मतदान न केलेले शिक्षक मतदार-508

जळगाव
एकूण मतदान- 13122
झालेले मतदान-12500
टक्केवारी-95.26%
मतदान न केलेले शिक्षक मतदार-622

नाशिक
एकूण मतदान-25302
झालेले मतदान-13184
टक्केवारी-91.63%
मतदान न केलेले शिक्षक मतदार- 2118

अहमदनगर
एकूण मतदान-17392
झालेले मतदान-16327
टक्केवारी-93.88%
मतदान न केलेले शिक्षक मतदार-1065

COMMENTS