Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरातील वाळुंज वस्तीवर धाडसी दरोडा

25 तोळे सोने व एक लाखाचा ऐवज घेवून चोरटे फरार

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल वाळुंज वस्तीवर पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे 25 त

Ahmednagar : कोठला व हवेली परिसरात सवार्यांचे दर्शन पूर्णपणे बंद l Lok News24
अशोक कोळेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल वाळुंज वस्तीवर पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे 25 तोळे सोने व 1 लाख रुपयांची रोकड असा एकुण 16 लाख रुपयांचा ऐवज लुटुन नेला. घरात एकुण 30 माणसे असताना दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी प्रथम स्प्रेचा वापर करुन प्रत्येक खोलीतील व्यक्तींना बेशुद्ध केले.कपाटे उचकण्यापूर्वी सोने शोधण्याच्या यंञाच्या साहय्याने कपाटाची तपासणी करुनच तेच कपाट फोडण्यात आले. देवळाली प्रवरा पोलिस चौकी म्हणजे असून अडचन नसून खोळंबा आहे.वरीष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले असून चाळी हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांची सुरक्षा राम भरोसे आहे.

             याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा ता.राहुरी वाकणवस्ती रोड लगत दत्ताञय पंढरीनाथ वाळुंज यांची वस्ती असून 4 भावांचे एकञित कुटुंबातील 30 माणसांचे  कुटुंब आहे.पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांनी स्वयंपाकघराच्या दरवाचा कडी कोयंडा तोडून प्रवेश केला. घरात एकुण 9 ते 10 खोल्या आहे.दरोडेखोरांनी प्रथम प्रत्येकाच्या तोंडावर स्प्रे मारुन बेशुद्ध केले. चोरी होताना अनिता वाळुंज यांना जाग आली असता त्यांनी दरवाजा उघडला असता दरोडेखोरांनी प्रथम त्यांच्या गळ्याला चाकू लावला. तोंडावर स्प्रे मारुन बेशुद्ध केले. अंगावरील दागिणे काढुन घेतले.प्रत्येक घरातील कपाट उचकण्यापूर्वी मशिनच्या सह्याने कपाटात सोने आहे की नाही याची तपासणी करुनच कपाटा फोडण्यात आले.9 ते 10 खोल्यातून त्यांनी सुमारे 25 ते 30 तोळे सोने दरोडेखोरांच्या हाथी लागले आहे.तसेच एक लाख रुपयांची रोख रक्कम हाथी लागल्याने दरोडेखोरांची चांदी झाली आहे. दरोडेखोरांनी प्रथम अनिता वाळुंज यांना बेशुद्ध केले.त्यानंतर दत्ताञय वाळुंज व बेबी वाळुंज हे त्यांच्या खोलीत झोपेल असताना झोपेतच त्यांच्या तोंडावर स्प्रे मारण्यात आला. तर महेश वाळुंज व पोर्णिमा वाळुंज वत्यांचा दोन लहान मुलांना बेशुद्ध केल्या नंतर इतर खोल्यांचे बाहेरुन दरवाजे लावून घेण्यात आले. ज्या खोल्यात कपाट आहे तेथे यंञाच्या साहय्याने तपासणी करुन कपाटातील सोन्याचे दागिणे लुटण्यात आले. दरोडेखोर आल्या मार्गे परत जात असताना स्वयंपाक घरात कानातील एक दागिणा व अंगठी दोन दागिणे पडलेले होते. बाहेर जात असताना दरोडेखोरांच्या हातातून हे दागिणे पडले असावे. दरोडेखोर दरोडा घालीत असताना बर्‍याच वेळाने एका दरोडेखोराचा फोन वाजला आणि त्यानंतर दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. दरम्यान रात्री दोन ते तीनच्या वेळेत चारचाकी वाहन वेगाने गेले आणि काही वेळातच परत गेले. पहाटे तीनच्या दरम्यान वाळुंजच्या दुसर्‍या वस्तीवरील मजुराने तीन रेसर मोटारसायकल वाळुंज वस्तीकडे जाताना पाहिल्या.साडेतीनच्या दरम्यान याच मोटारसायकली लाईट बंद करुन वेगाने वाकाणवस्तीकडे गेल्याचे सांगितले. पोलिसांनी देवळाली प्रवरा सोसायटी चौक व इतर दोन ते तीन ठिकाणाहुन सीसीटिव्ही फुटेज मिळविले आहेत. त्यातून दरोडेखोरांचे धागेदोरे पोलिसांना हाथी लागले आहेत.

                  घटनास्थळी पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्‍वान पथकास पाचारण केले होते. परंतू दरोडेखोरांनी हँडग्लोज वापरुन सर्व ठिकाणी स्पर्श केल्याने दरोडेखोरांचे ठसे मात्र मिळू शकले नाही. घरातील प्रत्येक ठिकाणी स्प्रेचा वापर केल्याने श्‍वान पथकास माग काढता आला नाही. पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी भेट देवून पहाणी केली. पोलिस उपनिरीक्षक समाधान पडोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू आहेर, पो.काँ. प्रदीप ढाकणे, नदीम शेख, अमोल गायकवाड, गणेश शिंदे आदींनी पाहणी करुन दरोडेखोरांच्या मागावर चार पथके पाठविण्यात आली.

COMMENTS