Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पाच कोटींचे अंमली पदार्थ जप्त

पुणे ः पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे मेथामाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या चारजणांना जे

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे – मुख्यमंत्री फडणवीस
नीटची फेरपरीक्षा घेणे अयोग्य  
सुषमा अंधारेंची 40 भावांना राखी बांधण्याची इच्छा

पुणे ः पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे मेथामाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी करणार्‍या चारजणांना जेरबंद करण्यात आले आहे. सातारा ते लोणावळा यादरम्यान आरोपींचा पाठलाग करुन कस्टम पथकाने पाच कोटी रुपये किंमतीचे एक किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कस्टम विभागाने बुधवारी दिली आहे.
कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ पथकास सातारा येथून मुंबईला मोठया प्रमाणात मेथामाफेटामीन या अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, कस्टम पथकाने सातारा येथून आरोपींच्या काळया रंगाच्या फोर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग केला. खेड शिवापूर टोलनाका येथे गाडी आली असताना, कस्टम पथकाने संबंधित गाडी पकडली. त्यावेळी गाडीत दोघेजण होते, त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला 850 ग्रॅम मेथामाफेटामीन मिळून आले. परंतु त्यांचे आणखी दोन साथीदार लोणावळयात त्यांना भेटणार असून त्यांच्याकडेही अंमली पदार्थ आहे. त्यानुसार कस्टम पथकाने लोणावळा पर्यंत सदर गाडी घेऊन जात, त्याठिकाणी आणखी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनही 200 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी पकडण्यात आलेले आरोपी हे 25 ते 35 वयोगटातील असुन ते यापूर्वी कुरिअर कंपनीत कामास होते. त्याठिकाणचे संर्पकाचा वापर करुन त्यांनी अंमली पदार्थाची तस्करी सुरु केली होती का? याबाबत अधिक तपास केला जात आहे. नेमके सदर अंमली पदार्थ कोठून आणले होते, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, त्यांचे अन्य साथीदार कोण आहे, त्यांच्यात किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला याबाबतचा अधिक तपास कस्टम विभागाचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS