Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नमो चषक 2024 पारितोषिक वितरण संपन्न

चांदवड प्रतिनिधी -  चांदवड तालुका नमो चषक स्पर्धा 2024 पारितोषिक वितरण समारंभ आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली रेणुका लॉन्स चांदवड

शैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारीत अभ्यासक्रम तयार करावे ः डॉ. पराग काळकर
सलमानची अजब स्टाईल!
नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यंमत्री

चांदवड प्रतिनिधी –  चांदवड तालुका नमो चषक स्पर्धा 2024 पारितोषिक वितरण समारंभ आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली रेणुका लॉन्स चांदवड येथे संपन्न झाला. तालुका भरातून 5 ते 10 हजार स्पर्धक क्रीडा -कौशल्य या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यात नेमिनाथ जैन विद्यालयाची विद्यार्थिनी *गौरी राजू जेजुरकर* (8वी ) हिने *चित्रकला* स्पर्धेत पारितोषिक पटकावले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते तिचा सहकुटुंब रोख पारितोषिक, ट्रॉफी, व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सुनील शेलार, सभापती विजय धाकराव, डॉ.नितीन गांगुर्डे, डॉ. भाऊराव देवरे, मोहनलाल शर्मा, कल्याणी कुलकर्णी, नेमिनाथ जैनचे प्राचार्य शिवदास शिंदे, कलाशिक्षक के व्ही अहिरे, संगीता चव्हाण दत्ता ठाकरे, साईनाथ कोल्हे, राहुल हांडगे, सागर अहिरे, मुकेश आहेर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर एस पाटील सर यांनी केले.

COMMENTS