Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’नामानिराळा’ ग्रामीण साहित्यिक नामदेवराव देसाई यांचा गौरवग्रंथ

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी ग्रामीण साहित्यिक म्हणून नामदेवराव देसाई यांना सर्वजण जाणतात. 04डिसेंबर 1939रोजी नाऊरसारख्या छोटया खेड्यात जन्मल

पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…
अकोल्यात 132 दिव्यांगांनी केले घरातून मतदान
Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)

महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी ग्रामीण साहित्यिक म्हणून नामदेवराव देसाई यांना सर्वजण जाणतात. 04डिसेंबर 1939रोजी नाऊरसारख्या छोटया खेड्यात जन्मलेले, शेतकरी परिवारात कष्ट करीत ते बी. एस्सी. झाले. बेलापूरला शिक्षकाची नोकरी केली. अनेक सहकारी साखर कारखान्यात हेड टाईम कूपर म्हणून काम केले. साहित्यिक,सामाजिक उपक्रमात त्यांनी सूत्रसंचालन, संयोजन आणि नेतृत्व यादृष्टीने नावलौकिक प्राप्त केला. विविध वृत्तपत्रात लेखन केले. त्यांच्या मार्मिक, उपहास आणि प्रबोधक ग्रामीण कथांनी वाचकांची मने जिंकली. त्यांचे कथाकथन म्हणजे हास्याची मेजवानी होती. असे तुफान विनोदी लेखक नामदेवराव देसाई यांचे 12जून 2023रोजी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले नि जणू मराठी ग्रामीण विनोद पोरका झाला. अशा साहित्यिकांवर मी(डॉ.बाबुराव उपाध्ये ) ’नामानिराळा’हा ग्रन्थ संपादित केला. हा गौरवग्रंथ अनेकदृष्टीने लक्षणीय आहे.
  ’नामानिराळा ’या 150पानांच्या गौरवग्रन्थात 31लेखकांचे लेख आहेत.पत्रकार प्रकाश कुलथे आणि सौ. स्नेहलता कुलथे यांच्या श्रीरामपूर येथील स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे हा गौरवग्रन्थ प्रकाशित झाला. मी(डॉ. बाबुराव उपाध्ये ) हा ग्रंथ स्व.जयश्री नामदेवराव देसाई यांना अर्पण केला आहे.नामदेवराव देसाई यांनी  ’पूर्वसूत्र :ऐशी कळवळ्याची जाती ’ यामध्ये लिहिले आहे, पेपरला बातमी आली. नामदेवराव देसाई यांचा गौरव ग्रंथ प्रकाशित करीत आहोत. लेख पाठवावेत. संपर्क डॉ. बाबुराव उपाध्ये, कुणीतरी मला बातमी सांगितली. मलाहीआश्‍चर्य वाटले, बातमी खरी होती. काही दिवसांनी मी श्रीरामपूरला गेलो, मनावर दडपण आले होते. बाबुराव घरी भेटले, त्यांनी गौरवग्रंथाची कल्पना सांगितली., बाबुराव शांतपणे बोलत होते, माझ्याकडून काय अपेक्षा? मी म्हणालो, आम्हाला लागेल ती माहिती द्यायची , आणि शांतपणे पाहत राहायचे, बाकी सारं मी पाहून घेईन, बाबुराव म्हणाले,  मी चकित झालो. नामदेवराव देसाई यांनी आशीर्वाद देताच मी(डॉ. उपाध्ये )  वृत्तपत्रातील  बातमीला प्रतिसाद देत ज्यांनी उस्फूर्तपणे लेख दिले, त्या 23लेखकांचे लेख येथे समाविष्ट केले आहेत. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा पहिला लेख मिळाला.त्यांनी ’नामानिराळा साहित्यिक ’या लेखात म्हटले आहे, ते आम्हा राजकीय व्यक्तीसंदर्भात आढे वेढे न घेणारे लिखाण प्रत्येक धुळवडीला करत असत, ते वाचून मनात हसायला येत असे.आज आयुष्यात प्रत्येकाला अश्रू आहेत पण हसवणं अत्यंत अवघड आहे. प्राचार्य टी. ई. शेळके, यांनी ’निर्मळ व्यक्तिमत्व ’म्हणून नामदेवराव देसाई यांचा गौरव केला. प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांनी मराठमोळे विनोदी लेखक म्हणून आठवणी सांगितल्या. प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांनी ’सर्जनशील साहित्यिक ’, प्रा. डॉ. शिरीष लांडगे यांचा ’जिंदादिल लेखक ’, प्राचार्य शंकरराव अनारसे यांचा ’एक सच्चा ग्रामीण साहित्यिक ’ह लेख आठवणी आणि चिंतनपर आहेत. यशवंत पुलाटे, भाऊ थोरात, पत्रकार बाळासाहेब तनपुरे, सूर्यभान बापूजी आघाव, मुख्याध्यापक भागवतराव  मुठे, सुखदेव सुकळे, बापूसाहेब बाळाजी पटारे, विजय नागरे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, संगीता फासाटे /कटारे, प्रा. विलासराव तुळे, श्री एस. बी. भणगे, अजय घोगरे, लेविन भोसले, रणजित श्रीगौड, कृष्णा गोटीराम गहिरे, प्रा. डॉ. ज्ञानेश्‍वर घोटेकर,पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, राधाकिसन देवरे, सुनील गोसावी या सर्वांचे लेख मनस्वी भावणारे आहेत. कुटुंब जाणिवेने लिहिलेले लेख अतिशय मर्मस्पर्शी आहेत.त्यामध्ये  नितीन देसाई, सौ. तृप्ती जगताप, प्रा. नारायणराव दामोदर देसाई, सौ. प्रीती शुभम घोगरे, सौ. विजयालक्ष्मी नानासाहेब लोखंडे असे लेख नामदेवराव देसाई यांच्या गोतावळ्यातील भावबंधन मनात घर करणारे आहेत. मी (डॉ. बाबुराव उपाध्ये ) संपादकीयमध्ये लिहिले आहे की, नाऊरसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नामदेवरावाना मातृसुख लाभले नाही. ते दोन वर्षाचे असतानाच त्यांची आई त्यांना सोडून गेली
 पुढे लिहिले,
 तक्रार नाही, खंत नाही
  पूर्तीसाठीचा हा प्रवास असतो
केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्‍वास असतो
अशा कुसुमाग्रजांच्या ओळीतून नामदेवरावांचे नामानिराळे व्यक्तिमत्त्व आणि साहित्याला समर्पित झालेले ह गौरवशील व्यक्तिचित्र येथे मनात घर करते. त्यांच्या जाण्याने अंधार फार झाला, तरी या आठवणींचा शब्दप्रकाश जपू या, 01 जुलै 2024 रोजी त्यांना प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने म्हणावेसे वाटते, झाले बहु, होतील, पण नामदेवराव देसाईसम एकच मनात आहे एक लावनसूर्य त्यांच्या स्मृतिला हे शब्दनमन आहे !
डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर भ्रमणसंवाद 9270087640

COMMENTS