Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत 12 ते 31 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा

सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 12 डिसेंबर ते 31 डिसेंबर या

कराड मंडई परिसरात राडा; तलवार हल्ल्यात एक गंभीर
सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील
वीजचोरीप्रकरणी पश्‍चिम महाराष्ट्रात 7 हजारांवर आकडे जप्त

सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 12 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील कृष्णा, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांचा समावेश आहे.
कृष्णा नदी संवाद यात्रा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा दि. 12 डिसेंबर रोजी क्षेत्र महाबळेश्‍वर येथून सुरु होवून क्षेत्रमाहुली येथे दि. 26 डिसेंबर रोजी संपणार आहे. तर दुसरा टप्पा दि. 27 डिसेंबर रोजी चिंचणेर वंदन येथून सुरु होवून दि. 31 डिसेंबर रोजी तांबवे-कोळे-बहे-बोरगाव येथे समाप्त होणार आहे. वेण्णा नदीची संवाद यात्रा दि. 13 डिसेंबर रोजी वेण्णा लेक, महाबळेश्‍वर येथून सुरु होवून दि. 18 डिसेंबर रोजी वाढे ता. सातारा येथे संपणार आहे. येरळा नदीची संवाद यात्रा दि. 19 डिसेंबर रोजी मांजरवाडी, ता. खटाव येथून सुरु होवून दि. 27 डिसेंबर रोजी चितळी, ता. खटाव येथे समाप्त होणार आहे. माणगंगा नदीची संवाद यात्रा गाडेवाडी, ता. माण येथून दि. 13 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. या नदीच्या संवाद यात्रेचा समारोप दि. 18 डिसेंबर रोजी राजेवाडी मध्यम प्रकल्प, ता. माण येथे होणार आहे.
नदी स्वच्छता व संवर्धन यासाठी राबविण्यात येणार्‍या चला जाणुया नदीला अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या नदी संवाद यात्रेत नागरिक, समाजसेवी संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी केले आहे.

COMMENTS