राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !

देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी आज होणारे मतदान आणि २१ तारखेला होणारी घोषणा भारताला नव्या राष्ट्रपतीची ओळख करून देईल. राष्ट्रपती पदासाठ

ज्येष्ठ कवी ना धों महानोर काळाच्या पडद्याआड
सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर
राहुरी लोकन्यायालयात 186 प्रकरणे तडजोडीअंती निकाली

देशाच्या १५ व्या राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी आज होणारे मतदान आणि २१ तारखेला होणारी घोषणा भारताला नव्या राष्ट्रपतीची ओळख करून देईल. राष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी भाजपा आघाडीचे उमेदवार द्रोपदी मुर्मू या आदिवासी संथाल समाजातून असून पश्चिम बंगालच्या त्या मुळ रहिवासी आहेत. त्यांची निवड स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पहिल्यांदाच देशाला आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून लाभले आहेत. अर्थात अशा प्रकारची संधी दीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या काँग्रेसलाही मोठ्या प्रमाणात होती; परंतु काँग्रेसचे राजकारण हे कधीही खालच्या समूहाकडे उत्थानाच्या दिशेने वळले नाही, हा इतिहास निश्चितपणे सांगता येतो. मोदींच्या कार्यकाळात देशाला कोविंद यांच्या रूपाने दलित राष्ट्रपती तर द्रौपदीमुळे या राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी उमेदवार लाभल्या आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही भाजपाला जड जाईल, अशा प्रकारचा प्रवाद उमेदवार निवडीपूर्वी विविध राजकीय पक्षांमध्ये होता. परंतु द्रोपदी मुरमुक यांचे नाव जाहीर होतात, सर्वच राजकीय पक्षांपुढे एक वैचारिक पेच निर्माण झाला. देशाला 75 वर्षात आदिवासी राष्ट्रपती न लाभल्यामुळे मुरमुरे यांच्या उमेदवारीमुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये वैचारिक आणि नैतिक मुद्द्यांवर विचार करायला सुरुवात झाली. यात उत्तर भारतातील आणि खासकरून उत्तर प्रदेशातील दोन राजकीय पक्ष जे वैचारिक दंद्वाच्या प्रक्रियेमध्ये गणले जातात, त्यातील बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांना भूमिका घेणे आवश्यक होते. परंतु या दोन्ही पक्षांचे राजकारण हे वैचारिक पेक्षा एकमेकांच्या स्पर्धेचे किंवा विरोधाभासाचे अधिक झाले आहे. बहुजन समाज पक्षाने जी भूमिका घेतली त्या विरोधात समाजवादी पक्ष भूमिका घेतो किंवा समाजवादी पक्षाने जी भूमिका घेतली त्या विरोधात बसपा भूमिका घेते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी राष्ट्रपती पदासाठी दोन वेगवेगळ्या उमेदवारांना आपला पाठिंबा दिला आहे. समाजवादी पक्षाने विरोधी पक्षाचे राष्ट्रपती उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे तर बसपाने द्रौपदीमुळे या आदिवासी असल्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. अर्थात सर्वच पक्षांमध्ये आदिवासी खासदार असल्यामुळे त्यांच्या भूमिकांनाही महत्त्व द्यावे लागले आहे. शिवसेनेच्या संदर्भातही ही बाब महत्त्वपूर्ण ठरली शिवसेनेचे आदिवासी खासदार राजेंद्र गावित आणि आदिवासी समाजाचे संघटक नेते असणारे शिवाजीराव ढवळे या दोन्ही नेत्यांनी शिवसेना प्रक्षेप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेने अधिकृत भूमिका जाहीर केली; त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा दिला. या संदर्भात देशातील दलित खासदारांना देखील आपली भूमिका बजवावी लागत असल्यामुळे प्रत्येक पक्षातील दलित खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे. एकंदरीत पाहता द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला बहुपक्षीय पाठिंबा, यामुळे त्यांची राष्ट्रपती पदावर निवड होणे ही जवळपास स्पष्ट झालेली वस्तुस्थिती आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अर्थात यासाठी ओबीसी खासदारांनी देखील आपली वैचारिक भूमिका घेऊन राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनाच पाठिंबा जवळपास निश्चित केला आहे. ही वस्तुस्थिती पाहता आज राष्ट्रपतीपदासाठी होणारे मतदान हे निश्चितपणे सत्ताधारी आघाडीचे उमेदवार असणाऱ्या मुरमुरे यांच्याकडेच झुकणारे असल्यामुळे देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी त्यांची निवड किंवा त्यांचा विजय हा निश्चित स्वरूपाचा झालेला आहे, असे एकंदरीत परिस्थितीतून स्पष्ट होते आहे. अर्थात मुरमुरे यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार साठी जाहीर होतात देशभरातून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की, त्या संघाशी निगडित आहेत; परंतु, कोणताही राजकीय सत्ताधारी पक्ष जेव्हा आपल्या उमेदवाराची निवड करतो, तेव्हा तो आपल्या पक्षाचा उमेदवार कसा राहील, ही भूमिका निश्चितपणे पाहतो. तरीही भाजप किंवा संघाने निवड केलेले आदिवासी उमेदवार व्यवहाराच्या दृष्टीने अतिशय मोठी भूमिका आहे! त्यामुळे राष्ट्रपती किती कार्यकारी असणार यापेक्षा त्या समाजाला मिळणारा न्याय हा लोकशाहीमध्ये निश्चितपणे उल्लेखनीय मानला गेला पाहिजे.

COMMENTS