Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीआयएससी’ निकालात मुंबई-ठाण्याची बाजी

प्रथम क्रमांक मिळवणार्‍यांत तीन मुलींचा समावेश

मुंबई/प्रतिनिधी : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनतर्फे सीआयएससीई घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई आणि बारावी आयएससी परीक्षांचा निकाल रविवारी

मराठा समाजाचे ओबीसीकरण होवू देणार नाही
आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न करा परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल :संजय राऊत | LOKNews24
बीड तालुक्यात तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

मुंबई/प्रतिनिधी : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनतर्फे सीआयएससीई घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई आणि बारावी आयएससी परीक्षांचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. त्यात मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 99.8 टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणार्‍या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच राज्यातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधील श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमधील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय सरदेसाई, मालाडच्या चिल्ड्रेन्स अ‍ॅकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन यांचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेत 99.75 टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणार्‍या पाच विद्यार्थ्यांत ठाण्याच्या सिंघानिया स्कूलच्या इप्शिता भट्टाचार्यचा समावेश आहे. दहावीचा निकाल 98.94 टक्के, तर बारावीचा निकाल 96.93 टक्के लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्‍चिम विभागाचा दहावीचा निकाल 99.81 टक्के, बारावीचा निकाल 98.34 टक्के लागला. विभागनिहाय निकालामध्ये दहावीच्या निकालात पश्‍चिम विभागाने 99.81 टक्क्यांसह देशात अग्रस्थान मिळवले. तर बारावीच्या निकालात 99.20 टक्क्यांसह दक्षिण विभागाने बाजी मारल्याचे नमूद करण्यात आले आहे. यंदा दोन लाख 37 हजार 631 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी दोन लाख 35 हजार 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक लाख 26 हजार 474 मुले, एक लाख आठ हजार 640 मुली आहेत. बारावीची परीक्षा 98 हजार 505 विद्यार्थ्यांनी दिली. त्यांतील 95 हजार 483 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 49 हजार 687 मुले आणि 45 हजार 796 मुली आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. दहावीचा निकाल मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अध्र्या टक्क्याने, तर बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 2.14 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 99.97 टक्के, तर बारावीचा 99.38 टक्के लागला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 1.03 टक्क्यांनी, तर बारावीचा निकाल 2.45 टक्क्यांनी घटला आहे.

COMMENTS