Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील डबेवाले आणि चर्मकारांना मिळणार हक्काचे घर

केवळ 25 लाखात 500 चौरस फुटाचे घर ः राज्य सरकारची घोषणा

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे.  यामध्ये शुक्रवार

शनिशिंगणापुरात शनि लीलामृत पाच दिवसीय ग्रंथ पारायण
महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 
147 गुंतवणूकदारांची 18 कोटींची फसवणूक

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे.  यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली. त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईत 500 चौरस फुटांचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील आजच्या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते. मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रिलिटीकडून 30 एकर जागा देण्यात आली आहे. नमन बिल्डर्सकडून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम केले जाणार आहे. नमन बिल्डर्सकडून ’ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर अवघ्या 25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तब्बल 12 हजार घरांची करणार निर्मिती – मुंबईच्या डबेवाल्यांसोबतच चर्मकार समाजासाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती केली जात असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी प्रियंका होम्स रियॅलिटीकडून 30 एकर जागा देखील देण्यात आली आहे. तर नमन बिल्डरच्या माध्यमातून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम होणार आहे. नमन बिल्डर्स ना नफा ना तोटा या तत्त्वार हे काम केले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळ असलेले घर अवघ्या 25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. येत्या तीन वर्षात या घराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारच्या वतीने निश्‍चित करण्यात आले आहे.

COMMENTS