मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल

Homeताज्या बातम्यादेश

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात द

Sangamner : महुसलमंत्री बाळासाहेब थोरात यांची गंगा माता मंदिर ट्रस्टला भेट (Video)
त्या पाचजणांच्या निर्णयाला आव्हान दिले जाणार? ; नगर अर्बन बँक पुन्हा राहणार चर्चेत
संविधानाशी विसंगत वर्तन आणि…

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलायम सिंह यांना खोलीतून आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. मुलायम सिंह यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, स्नुषा डिंपल यादव आणि बंधू शिवपाल यादव यांच्यासह कुटुंबातील इतर लोक रुग्णालयात पोहचले आहेत. सोबतच मुलायम सिंह यांच्या धाकटा मुलगा प्रतिक आणि त्याची पत्नी अपर्णा देखील रुग्णालयात पोहचले होते. मुलायम सिंह यांना रविवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर 82 वर्षीय मुलायम सिंग यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

COMMENTS