Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीचे वाळू उपसाविरोधात आंदोलन

देवळाली प्रवरा ः  मुळा प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रवरा नदी पात्रामध्ये शासनाच्या वाळू ठेक्याचा आडून जो

राहुरी जिजाऊंच्या लेकींच्या जल्लोषाने दणाणली
भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध
कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु ः डॉ.पाठक

देवळाली प्रवरा ः  मुळा प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रवरा नदी पात्रामध्ये शासनाच्या वाळू ठेक्याचा आडून जो बेसुमार वाळू उपसा सुरू होता. राहुरी तालुक्यातील सात्रळ, सोनगाव, धानोरे तसेच राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपुर ,हनुमंतगाव, पाथरे येथील शेतकर्‍यांनी शुक्रवार 24 मे 2024 पासून उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले होते.
                   या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगरचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, संजय पोटे, प्रभावती घोगरे, अशोक कदम, सुरेश थोरात, रामेश्‍वर सोलट, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे आणि जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक पदाधिकार्‍यांनी आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.
             उपोषणाच्या चौथ्या दिवशी दुपारनंतर जिल्हा गौण खनिज अधिकारी  वसीम सय्यद यांनी प्रमुख आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. आंदोलनाचे प्रमुख अरुण कडू पाटील यांचे समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके,एकनाथ घोगरे,बाळासाहेब विखे उपोषण करते आदिनाथ दिघे, बापूसाहेब दिघे समितीचे अध्यक्ष भास्कर फणसे आदींसोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहाजी मापारी गौण खनिजचे कुलथे  यांच्या समवेत आंदोलन थांबवण्याकरता तोडगा काढण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये चर्चा झाली परंतु आंदोलकांना शासनाच्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांचे सोबत चर्चा केली या चर्चेमध्ये कुठलीही परवानगी नसताना प्रवरा नदीमध्ये बोटीने बेसुमार वाळू उपसा सुरू असल्यामुळे पाणी पूर्णपणे गढूळ झाले आणि पाण्यावर डिझेल व ऑइलचा तवंग जमा झाल्यामुळे पाणी दूषित होऊन जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नियमांपेक्षा अतिरिक्त खोल वाळू उपसा केल्यामुळे विहिरीचे कठडे 25 ते 30 फूट उंच झाले आणि एका बाजूला कलले गेल्यामुळे शेतकर्‍यांना कड्याची उंची वाढल्यामुळे मोटर सोडणे मोटर काढणे पाईप फुटणे पाईपचा मेंटेनन्स करणे या सारख्या जिकिरच्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. बेसुमार वाळू उपसा झाल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी पातळी खोल गेल्याचे शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिले अनेक वाळू वाहतूकदार ओव्हरलोड वाहतूक करत असल्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक अपघातही या ठिकाणी झालेली आहेत. अशा अनेक तक्रारीचा पाढाच जिल्हाध्यक्ष फाळके यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर वाचला आणि हे सर्व वाळूचे ठेके बंद ठेऊन त्वरित चौकशी करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. रात्री उशिरा गौण खनिज शाखेच्या वतीने कुलथे  यांनी शिर्डी विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र घेऊन आंदोलन स्थळी आले व आंदोलकांनी सदर वाळू ठेका व वाळू उपसा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन मागे घेत असल्याचे शासनास लेखी स्वरूपात कळूवून आंदोलन पुढील चौकशी होईपर्यंत आंदोलन स्थगित करत असल्याचे आंदोलकांच्या वतीने अरुण कडू पाटील यांनी सांगितले. आंदोलनासाठी प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सहभाग घेतला होता यामध्ये दिनकर कडू, सिताराम दिघे, दत्तात्रय सिनारे, पाथरे ग्रा. सदस्य सागर कडू, सुजित वाबळे,राजेंद्र कडू, सागर डुक्रे, जयराम दिघे बाळासाहेब खर्डे, शाम दळे, सतीश शिंदे, हर्षल कडू, अक्षय कडू, रघुनाथ नालकर, चांगदेव शिंदे, सुधाकर कडू, निलेश खर्डे,एकनाथ जाधव, आकाश पलघडमल, सचिन दिघे, सूर्यभान शिंदे, अजीम तांबोळी, नाजीम इनामदार, आप्पासाहेब गागरे, दत्तात्रय पलघडमल, विनोद मोरे, प्रभाकर पलघडमल आदी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS