Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणने ठेकेदारांची बिले थकवल्याने 20 फेब्रुवारीपासून ठेकेदारांचा बंदचा इशारा

फलटण / प्रतिनिधी : केलेल्या कामाची लाखो रुपयांची बिले 6 महिने होऊनही मिळत नसल्याने वीज वितरण कंपनीकडील ठेकेदार नाराज झाले आहेत. बिले मिळाली नाही

स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे
संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. जे. धोटे
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

फलटण / प्रतिनिधी : केलेल्या कामाची लाखो रुपयांची बिले 6 महिने होऊनही मिळत नसल्याने वीज वितरण कंपनीकडील ठेकेदार नाराज झाले आहेत. बिले मिळाली नाही तर 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून महावितरणकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महावितरण फलटण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता गणेश जमाले यांना ठेकेदार संघटनेने याबाबत निवेदन दिले आहे. महावितरण फलटण विभागातील जिल्हा नियोजन व विकास समिती आणि राज्य शासनाच्या विविध योजनेतील वीज पुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामाच्या रकमा वीज वितरण कंपनीकडे कामे मंजूर होताना जमा झालेल्या असताना वीज वितरण कंपनी ठेकेदारांची बिले आदा करण्यात विलंब करत असल्याने कामे पूर्ण करण्यासाठी बँकातून घेतलेल्या कर्जावरील व्याज वाढत आहे. प्रसंगी दंड व्याजाचा फटका बसतो, शिवाय बँक कर्ज वेळेत परत न केल्याने होणारी नामुष्की आणि दर वाढीमुळे होणारे नुकसान या कात्रीत सापडून ठेकेदारांनी प्रसंगी नुकसान सोसून कामे पूर्ण केल्याने त्यांच्या कामाची बिले त्वरित मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरण थकीत बिले व दरवाढ बाबत ठोस भूमिका घेत नसल्याने ठेकेदारांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणार्‍या विविध कामांच्या निविदाद्वारे होणारी कामे होत असताना मटेरियलच्या दरात वाढ झाल्यास त्याप्रमाणात दर वाढ मिळते, प्रतिवर्षी डीएसआर निश्‍चित करुन त्याप्रमाणे दरवाढ दिली जात असताना वीज वितरण कंपनी मात्र 3 वर्षे एकच दर निश्‍चित करत असल्याने ठेकेदारांना अनेकवेळा नुकसान सोसावे लागत आहे. हे निदर्शनास आणून देत दरवाढ मिळण्याची मागणी ठेकेदार संघटना पदाधिकारी करत आहेत.
बिले मिळाली नाहीत तर 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ठेकेदार संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी विठ्ठल नाळे, प्रवीण कोल्हे, नानासाहेब काळोखे, वैभव झणझणे, प्रतीक दडस, नितीन भगत, समीर मेटकरी, देविदास जाधव, धवल बेंद्रे, दिलावर आतार, इम्रान मेटकरी, विक्रम येळे, मयूर जठार, विशाल कणसे, सुजित ढेकळे, जितेंद्र पवार, चंद्रकांत धायगुडे यावेळी उपस्थित होते.

COMMENTS