मलिक-वानखेडे प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मलिक-वानखेडे प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

मुंबई- ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स विभागाचे

डेटाशिवाय आरक्षणाचा मार्ग अंधातरीच…
केज येथील वेळूवन बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न.
पाऊसपाणी मुबलक, तर रोगराईचा नायनाट; भेंडवळचा अंदाज जाहीर

मुंबई- ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खान प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबण्याची चिन्हे नसून, राज्यात हा सामना पुन्हा एकदा रंगतांना दिसून येत आहे.
समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांनी रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांना संबोधित करतांना आठवले म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्व प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. ते आमच्या समाजाची बदनामी करत आहेत. समीरच्या वडिलांचे नाव दाऊद नाही. मी त्यांची सर्व कागदपत्रेही पाहिली आहेत. नवाब मलिक हे आरोप लावत आहेत कारण त्यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात होता. समीर वानखेडे हा दलित आहे. जर आर्यनने अंमली पदार्थांचे सेवन केले नसते आणि त्याच्यावर कोणताही खटला नसता, तर न्यायालयाने त्याला इतके दिवस जामीन का दिला नव्हता? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यानंतर ज्ञानदेव वानखेडे म्हणाले की, मी आंबेडकरवादी आहे. जयभीमवाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही इथपर्यंत आला आहे, असं सांगतानाच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी भर पत्रकार परिषदेतच त्यांच्या जातीच्या सर्टिफिकेटसह इतर प्रमाणपत्रे दाखवली.

दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावयांचे फटाके फोडणार – सोमय्या
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांची नावे हिवाळी अधिवेशनात उघड करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी 12 दिवस नाटके केली. यात 3 मंत्र्यांच्या 3 घोटाळ्यांचा आणि त्यांच्या 3 जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचे राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केले. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केले. एकदम बॉम्ब फोडण्याचे काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.

याहून दुदैव काही असू शकत नाही -नवाब मलिक
खोटे जातप्रमाणपत्र दाखवून यांनी नोकरी मिळवली नसती तर गरीब होतकरु, दलित मुलगा किंवा मुलगी ती या पदावर बसली असती. नावाचा खेळ केलाय. दाऊद वानखेडे की ज्ञानदेव वानखेडे?, यास्मिन की जस्मीन?, काशीफ खान की काशीफ मलिक खान? या चित्रपटामध्ये नावांचा खेळही फार मोठा आहे. मात्र नाव बदलून तो मी नव्हे असे सांगून चालणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. समीर वानखेडे अनेक नेत्यांना भेटत असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्‍न विचारण्यात आला असता, नेत्यांना भेटले तो त्यांचा अधिकार आहे, असे मलिक म्हणाले. या पूर्वीही ते अनेक नेत्यांना, दलित नेत्यांना भेटले आहेत. आठवले साहेब त्यांच्यासोबत आहेत. ते दलितांचा हक्क हिरावून घेत आहेत आणि दलित नेते त्यांच्यासोबत आहेत याहून दूर्देवी काही असू शकत नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे.

COMMENTS