Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कु. गुंजन अग्रवालचा सत्कार

दहावी सीबीएसईमध्ये मिळवले 96 टक्के गुण

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता येथील साई योग फाउंडेशन वतीने राहाता शहरातील दहावी सीबीएसईमध्ये 96 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली कु.गुंजन आशिष अग्रवाल ही

दिलासादायक…यंदा पाणीटंचाई कमी, 3 गावांनाच टँकरने पाणी
श्री संत जगनाडे महाराज ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आदर्शवत ः  आ. आशुतोष काळे
डॉ. शिवाजी काळे यांचा गौरवग्रंथ प्रेरणादायी ः सुमतीताई घाडगे पाटील

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता येथील साई योग फाउंडेशन वतीने राहाता शहरातील दहावी सीबीएसईमध्ये 96 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली कु.गुंजन आशिष अग्रवाल हीच्या हस्ते वृक्षारोपण करून मान्यवरांच्या हस्ते तिचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. माझी वसुंधरा अंतर्गत त्रिशूलनगर येथील नगरपालिका उद्यानात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उद्यान परिसरातील अनावश्यक गवत व कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. कु. गुंजन व तिच्या आई वडिलांच्या हस्ते बागेत वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्तावना करून सूत्रसंचालन केले.सुनील मोकळ,संजय उबाळे,नारायण गाडेकर व साई योग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी कु.गुंजनच्या यशाबद्दल कौतुक करत तीला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना कु. गुंजनचे वडील आशिष अग्रवाल यांनी गुंजनच्या यशाची दाखल घेत तिचा  सत्कार केल्या बद्दल सर्वांचे आभार मानत यापुढेही असेच मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी रविंद्र बोठे, भारत दवंगे, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, अ‍ॅड. गोरख दंडवते, बबलू फटांगरे, रविंद्र धस, संजय बाबर, उमेश लुटे, अनिल सातव, संजय वाघमारे, विठ्ठल निर्मळ, पांडुरंग गायकवाड, व्यंकटेश अहिरे, शिवाजी पोटे, राजेंद्र बांगर, अरुण बिबे, भागवत वाघमारे, प्रणव लावर, आशिष अग्रवाल, दीपा आशिष अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीत वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.  

COMMENTS