Homeताज्या बातम्यादेश

iPhone विकत घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या मुलाला विकलं ?

पश्चिम बंगाल प्रतिनिधी - सध्या रिल्स बनवण्याचं क्रेज वाढत आहे. रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करत आहे. रिल्स बनवण्याच्या नादात जीवाचा धोका देख

श्रीगोंद्यात वीज नसल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक
एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ
चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण

पश्चिम बंगाल प्रतिनिधी – सध्या रिल्स बनवण्याचं क्रेज वाढत आहे. रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करत आहे. रिल्स बनवण्याच्या नादात जीवाचा धोका देखील पत्करत आहे. रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करून जास्त लाईक्स आणि व्यूअर्स मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तत्पर आहे. रिल्स बनवण्याच्या नादात लागून पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका जोडप्याने आपल्या मुलाला आयफोन घेण्यासाठी विकले. त्याला आयफोन घ्यायचा होता जेणेकरून तो इंस्टाग्राम रील्स बनवू शकेल. रिपोर्टनुसार, हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्याशी संबंधित आहे. पोलिसांनी मुलाची आई (साथी) आणि बाळाला विकत घेणाऱ्या महिलेला (प्रियांका घोष) अटक केली आहे. मात्र, मुलाचे वडील (जयदेव) अद्याप फरार आहेत

COMMENTS