Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई जगाचा पोशिंदा तर शेतकरी बाप व दिशा देणारा शिक्षक ः सुनील कडलग

संगमनेर ः अहोरात्र काबाडकष्ट करणारी वंदनीय आई, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बाप आणि आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिक्षक हेच आपले जी

वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
केडगाव महामार्गावर अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू
स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामांना मान्यता

संगमनेर ः अहोरात्र काबाडकष्ट करणारी वंदनीय आई, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बाप आणि आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिक्षक हेच आपले जीवनादर्श असावेत. त्यांना आदर्शस्थानी ठेवूनच विद्यार्थ्यांनीआपल्या जीवनातील ध्येय व स्वप्ने साकार करावीत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्‍वस्त सुनील कडलग यांनी केले.

तालुक्यातील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि.10 रोजी संपन्न झाला त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव खुळे , तर विचारमंचावर प्राचार्य श्रीकांत माघाडे, सामाजिक कार्यकर्ते नरेन्द्र चांडक, अशोकराव दिघे, बाबासाहेब वामन,बबन दिघे,विजय वामन, रंगनाथ खुळे, राम दिघे, चांगदेव वामन, खुळे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी शाळेने वर्षभरात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. शालेय उपक्रमांंबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयाचा प्रत्येक वर्ग डिजिटल रूम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोठे सभागृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्याची स्पिकिंग गुणवत्ता वाढवण्याचे दृष्टीने स्पोकन इंग्लिश प्रकल्प, स्कॉलरशिप असे वेगवेगळे उपक्रम विद्यालयात चालू आहेत.  याप्रसंगी कडलग यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषणात कडलग पुढे म्हणाले की आजची पिढी इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युबचे रील्स आणि व्हाट्सअपच्या मागे धावत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी जिवलग मावळ्यांच्या आधारे या महाराष्ट्राला अन्याय, अत्याचार आणि मुघलांच्या अनन्वित अत्याचारापासून मुक्त केले, असे उद्दात्त ध्येय विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनासमोर ठेवले पाहिजे. आपली परिस्थिती जेवढी प्रतिकूल आहे तेवढेच यश मिळण्याची शक्यता  अधिक आहे. कारण प्रवाहाविरुद्ध पोहणारेच जीवनात यशस्वी होतात असेही ते म्हणाले. याप्रसंगी सदुकर थोरात यांनी सूत्रसंचालन केले. हर्षद कोल्हे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक गुंजाळ,नानासाहेब कोल्हे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

COMMENTS