Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडले अन् चोरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले !

लातूर प्रतिनिधी - मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या प्राध्यापिकेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावत पळ काढल्याची घटना लातूर शहरानजीक असलेल्य

“आता लॉकडाउन लावावाच लागेल” | Maharashtra Lockdown |
पाक चाहत्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून रोखले
कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय

लातूर प्रतिनिधी – मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या प्राध्यापिकेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावत पळ काढल्याची घटना लातूर शहरानजीक असलेल्या पाखरसांगवी मार्गावर गंगानगर येथे बुधवार, 31 मे रोजी घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी पंचशील केरबा डावकर (वय 42, रा. गंगानगर, पाखरसांगवी, लातूर) या बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. दरम्यान, पाखरसांगवी परिसरातील रस्त्याच्या कडेने त्या चालत जात असताना, एका फार्महाउसनजीक पाठीमागून काळ्या-पांढर्‍या रंगाच्या स्पोर्टस् दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी फिर्यादीच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोनसाखळी (किंमत 54 हजार रुपये) काही कळायच्या आतच हिसकावत पळ काढला.  याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु. नं. 394 / 2023 कलम 392, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली. पोलिस हवालदार बेल्हाळे तपास करत आहेत.

COMMENTS