Homeताज्या बातम्याकृषी

मोरणा-गुरेघर धरणात शिल्लक 35% पाणीसाठा; ऐन उन्हाळ्यात टंचाई भेडसावणार

मोरणा-गुरेघरचे पाणी व्यवस्थापन विभागातील जनतेच्या सोयीसुविधा नुसार केले जाते. मात्र, धरणाच्या किरकोळ कामामुळे धरण व्यवस्थापनाला यंदा 10 मे पर्यंत

शॉर्टसर्किटमुळे सरताळे येथे साडेचार एकर क्षेत्रावरील ऊस जळला
विश्‍वास कारखान्याच्या अध्यक्ष पदी आ. मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर
तुर, ज्वारी, तांदळाच्या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता


मोरणा-गुरेघरचे पाणी व्यवस्थापन विभागातील जनतेच्या सोयीसुविधा नुसार केले जाते. मात्र, धरणाच्या किरकोळ कामामुळे धरण व्यवस्थापनाला यंदा 10 मे पर्यंत पाणीसाठा संपवून धरणाच्या किरकोळ कामे सुरू करायचे आहेत. याबाबत आमच्या वरिष्ठांनी लेखी पत्रही प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले आहे. एस. एस. खरात
उपविभागीय अभियंता कराड क्र. 8

मोरगिरी / वार्ताहर : उन्हाची तीव्रता वाढू लागल्यामुळे मोरणा धरणातील पाणीसाठा खालावला असून सध्या धरणात 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे धरणातून होणारी वीजनिर्मिती 15 दिवसापासून बंद करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापणाकडून देण्यात आली. सगळीकडे तापमानात वाढ होत असून अनेक ठिकाणचे जलसाठे आता कमी होऊ लागले आहेत. त्याच बरोबर डोंगरात असणारे जलस्त्रोत आटूू लागल्याने ओढ्यांना, नदीला येणार्‍या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे धरणात येणार्‍या पाण्याची आवक पूर्णपणे मंदावली आहे. त्यामुळे याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत आहे. धरणात सध्या 13.100 इतका पाणीसाठा असून धरणाची पाणीपातळी 650.900 मी. इतकी आहे. धरणात सध्यस्थीतीला 35 टक्के पाणीसाठा आहे. वीज तयार करण्यासाठी लागणारे पाण्याची आवक होत नसल्याने 15 दिवसापासून वीजनिर्मिती बंद केली आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा जाणवत आहे. धरणात पाणी कमी झाले असले तरी उपलब्ध असणार्‍या पाण्याचा शेतीसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे मोरणा भागात असणार्‍या शेतीला बारमाही पाण्याचा तुटवडा जाणवत नाही. मात्र, या वर्षी धरणाच्या वक्र दरवाजे यांची दुरुस्ती करणे गरजेचे आसल्यामुळे धरणातील पाणीसाठा हा पूर्णपणे संपवणे गरजेचे आहे. याबाबत धरण क्षेत्राखाली येणार्‍या गावांना लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मागील 15 दिवसापूर्वी नोटीस दिली आहे. यंदा धरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे मोरणा विभागात पाण्याची टंचाई भासणार आहे. संबधित ग्रामपंचायतींनी गावातील पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी विहरी, तलाव तसेच ग्रेव्हीटी याची स्वछता करून टंचाई काळात पाण्याची व्यवस्था करावी, अशी ही मागणी विभागातील ग्रामस्थांमधून होत आहे.

COMMENTS