Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एका लाखापेक्षाही अधिक शेतकरी आत्महत्यांच्या विचारात

मराठवाड्यातील विदारक वास्तवाचे विधिमंडळात उमटले पडसाद

मुंबई/प्रतिनिधी ः मराठवाडा विभागाचा विकासाचा अनुशेष अजूनही प्रलंबित असून, सिंचनाच्या कोणत्याही सोयी-सुविधा नसल्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांची

कोतुळेश्‍वर विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश
उंदीर, खेकड्यांचा कारनामा 17 कोटींना
गौताळा अभयारण्यात 15 सप्टेंबरपर्यंत बंदी

मुंबई/प्रतिनिधी ः मराठवाडा विभागाचा विकासाचा अनुशेष अजूनही प्रलंबित असून, सिंचनाच्या कोणत्याही सोयी-सुविधा नसल्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती निसर्गाच्या भरोश्यावर आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गांच्या प्रकोपामुळे मराठवाड्यातील शेतकरी अस्वस्थ झाला असून, तो आत्महत्या करण्याच्य विचारात आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात गेल्या दशकभरात म्हणजे 2012 ते 2022 या कालावधीमध्ये आठ हजार 719 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर करण्यात आलेल्या कर्जमाफीसह विविध योजना तोकड्या पडल्या आहेत. निवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात मराठवाड्यात अजूनही 1 लाख पाच हजार 754 शेतकरी कुटुंब अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत. त्यांच्या मनात आत्महत्यांचे विचार येत असल्याने त्यांना नैराश्यातून दूर करण्यासाठी तातडीची मदत म्हणून रोख हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली होती.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित करत शेतकर्‍यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. दरम्यान शुक्रवारी सभागृहात बोलतांना खडसे म्हणाले की, मराठवाड्यातील 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून 500 रुपये महिना दिला जात आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्याबाबत माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाबाबत कृषीमंत्री यांनी छाननी करावी. तसेच याबाबत करवाई करावी. केंद्रेकर यांचे म्हणणे आहे की, पेरणीच्या वेळीस शेतकर्‍याला रोख रक्कम देण्यात यावी आणि शेतकर्‍यांना हेक्टरी अनुदान दिले पाहिजे असे त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. केंद्रेकर यांनी दिलेल्या अहवालात एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर 2 लाख 98 हजार 51 शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे. तर मराठवाडा विभागात सन 2012 ते 2022 या कालावधीत एकूण 8 हजार 719 शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी 923 नापिकीमुळे, 1 हजार 494 कर्जबाजारीपणामुळे, 4 हजार 371 नापिकी व कर्जबाजारीपणा या दोन्ही एकत्रित कारणामुळे. तर 2 कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे आणि 1 हजार 929 इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दहा वर्षात 8 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या – औरंगाबाद विभागात 2012 ते 2022 या कालावधीत एकूण 8 हजार 719 शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यापैकी 923 नापिकीमुळे, 1404 कर्जबाजारीपणामुळे, चार हजार 731 नापिका व कर्जबाजारीपणा या दोन्ही एकत्रित कारणामुळे, दोन कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे व एक हजार 929 इतर कारणांमुळे झाल्या आहेत. सद्य:स्थितीत शासनाने शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रदान करावयाच्या अनुदानाचे कर्जबाजारीपण, नापिकी व कर्ज परतफेडीचा तगादा हे तीन निकष निश्‍चित केले आहेत. तथापि सदर कारणांव्यतिरिक्त इतर कारणेदेखील शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

COMMENTS