Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये 63 हजारांपेक्षा अधिक क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई : केंद्र सरकारने 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मुंबईत 2023 मध्ये तब्बल 63 हजारांहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळल

देशात कोरोना रुग्णांचा पाच महिन्यातील उच्चांक
Sangali : हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (Video)
सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींनी घेतली शपथ

मुंबई : केंद्र सरकारने 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मुंबईत 2023 मध्ये तब्बल 63 हजारांहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले असून, दोन हजारांहून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयमुक्तीबाबत केलेली घोषणा मुंबईत धूसर बनू लागली आहे.
गतवर्षी मुंबईमध्ये तब्बल 63 हजार 644 नव्या क्षयरोग रुग्णांची केंद्र सरकारच्या निक्षय प्रणालीवर नोंद झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी दिली. यावरून मुंबईत प्रत्येक तासाला साधारणपणे क्षयरोगाचे सात रुग्ण सापडत आहेत. तसेच 2 हजार 147 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना गतवर्षी फक्त 10 हजार 913 रुग्णांनी क्षयरोगावर मात केली आहे. क्षयरोग रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर फुफ्फुसाव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या क्षयरोगासाठी नऊ महिने आणि औषध प्रतिरोधी क्षयरोग रुग्णांसाठी दोन वर्षांनंतर त्यांच्या आजाराचे आकलन करण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्ण बरे होण्यात मदत होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एचआयव्ही झालेल्या रुग्णांमधील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याने त्यांना क्षयरोग होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे कुपोषिक बालकांना क्षयरोग होण्याचा धोका तीन पट अधिक असतो. क्षयरोग रुग्णांचा मृत्यू अन्य कोणत्याही कारणाने होऊ शकतो. मात्र असे असले तरी त्या रुग्णाचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याची नोंद होते. त्यामुळे क्षयरोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक दिसून येते. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के इतके आहे. निक्षयवर नोंदणी झाल्यानंतर ती अद्ययावत होण्यासाठी वेळ लागत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS