राज्यात दररोज 6 हून अधिक महिलांवर बलात्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात दररोज 6 हून अधिक महिलांवर बलात्कार

शिक्षेचे प्रमाण केवळ 13.7 टक्केच ; दररोज अत्याचाराच्या 108 घटना

नवी दिल्ली/प्रतिनिधी : नुकताच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, आत्महत्या करणार्‍य

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार,०७ मार्च २०२२ l पहा LokNews24
मिल्लीया महाविद्यालयात अंगदान जागृती कार्यक्रम संपन्न
कालिचरण महाराजांना उमेदवारी दिली तर…

नवी दिल्ली/प्रतिनिधी : नुकताच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, आत्महत्या करणार्‍यांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या सर्वाधिक असून, 2021 हे प्रमाण तब्बल 7.2 टक्के वाढले आहे. याचबरोबर बलात्कारांच्या घटनेत देखील वाढ झाली असून, महाराष्ट्रात 2021 मध्ये बलात्काराच्या तब्बल 2 हजार 496 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनांत तब्बल 2,506 महिला बलात्काराच्या बळी ठरल्या. अशाप्रकारे राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दररोज सरासरी 6 हून अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे.यातील गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ 13.7 टक्के आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2021 मध्ये महाराष्ट्रात महिलांविरोधात दररोज 108 गुन्हे घडले. या गुन्ह्यांची पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली. राज्यात एकूण गुन्ह्यांत महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण 66 टक्के आहे. आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. 2021 मध्ये विविध आयपीसी कलमांतर्गत महाराष्ट्रात महिलांविरुद्ध एकूण 39 हजार 526 गुन्हे नोंदवण्यात आले. 2018 मध्ये 35,497, 2019 मध्ये 37,144 आणि 2020 मध्ये 31,954 प्रकरणे नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात 2021 मध्ये बलात्कारासह खुनाच्या 23 घटना घडल्या. यामध्ये बळींची संख्या 23 होती. म्हणजेच दर महिन्याला राज्यात बलात्कारासह खून किंवा सामूहिक बलात्काराच्या एकापेक्षा जास्त घटना घडल्या. महिलेची बदनामी या उद्देशाने तिच्यावर अत्याचार केल्याच्या 10,568 घटना 2021 मध्ये घडल्या. तर 89 महिला सायबर क्राईमच्या बळी ठरल्या आहेत.

गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण नगण्य
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्याच्या बाबतीत आरोपी दोषी ठरवण्याचे प्रमाण कमी आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 मध्ये मुंबईतील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये दोषी ठरण्याचे प्रमाण केवळ 26.2 टक्के होते. तर, याच काळात दिल्लीचा दोषी ठरविण्याचा दर 38.4 टक्के, कोईम्बतूर 30.8 टक्के, इंदूर 41.3 टक्के, कानपूर 53.8 टक्के आणि कोलकातामध्ये हा दर 100 टक्के होता. त्याचप्रमाणे पुण्याचा दोषी ठरविण्याचा दर 19.6 टक्के आणि नागपूरचा केवळ 10.8 टक्के होता.

COMMENTS