Homeताज्या बातम्यादेश

अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल

नवी दिल्ली ः हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापूर्वीच मान्सून रविवारी अंदामनमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे

पुणेवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न 
जिल्हा लोकल रिट कोर्ट सत्याग्रह जारी
आंबेजोगाईत सहा जणांचा मृत्यू ; नातेवाइकांचा आरोप; रुग्णालय प्रशासन असहमत

नवी दिल्ली ः हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापूर्वीच मान्सून रविवारी अंदामनमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा वेळेवर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून वारे मालदीव, कोमोरिनच्या काही भागात, बंगालच्या उपसागराच्या काही भागात, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात रविवारी दाखल झाले आहेत.
हवामान विभागाने ि शनिवारी (दि.18) दिलेल्या माहितीनुसार, येत्या 48 तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु अंदाजाच्या काही तासांपूर्वीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. सर्वसाधारण 22 मे च्या दरम्यान मान्सून अंदमानात येतो, पण यंदा तीन दिवस आधीच मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. बुधवार 22 मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार 24 मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून, 24 मे दरम्यान मान्सून संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापेल, असे देखील हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.  भारताचे मुख्य भूमी म्हणजेच 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. जूनमधील पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. निकोबार बेटावर गेल्या 24 तासात चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मान्सून हा वेळेवर दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर सात जून पर्यंत मान्सून कोकण किणारपट्टी भागात आणि त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात 24 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा – हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भात रविवारपासून पुढील 5 दिवस म्हणजेच 24 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला,  यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍याचा इशारा देण्यात आला आहे. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

COMMENTS