Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंधार्यांना एक हजार कोटीचा खर्च अपेक्षित

      परभणी तालुक्यातील जोडपरळी, कोटा, पिंपळगाव कुटे आणि ममदापूर येथे पूर्णा नदीवर 10 दलघमिचे चार बंधारे जलसंपदा खात्याच्या वतीने लवकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौर्‍याची चोख व्यवस्था ठेवावी
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवू


      परभणी तालुक्यातील जोडपरळी, कोटा, पिंपळगाव कुटे आणि ममदापूर येथे पूर्णा नदीवर 10 दलघमिचे चार बंधारे जलसंपदा खात्याच्या वतीने लवकरच निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबत सन 2014 पासून आमदार डॉ. पाटील यांनी शासनाकडे मागणी करून सतत पाठपुरावा केला होता़  जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर जमिन यामुळे सिंचनाखाली येणार असून प्रत्येक बंधार्याला 2 कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे़  दरवर्षी पावसाळ्यात पूर्णा नदीतून लाखो लिटर पाणी पुराद्वारे वाहून जाते़  हे पाणी बंधार्याद्वारे अडवल्यास लाखो लिटर पाणी जिल्ह्याला उपलब्ध होणार असून त्याद्वारे 8 ते 10 हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे़ या बंधार्यांच्या निर्मितीसाठीची मागणी परभणी तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने अनेक वर्षांपासून शासनाकडे करण्यात येत होती़ आमदार डॉ. पाटील यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून सदर बंधार्यांच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर करण्याची मागणी केली होती़  त्या अनुषंगाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील जोडपरळी, कोटा, पिंपळगाव कुटे आणि ममदापूर येथे उच्चपातळी बंधारे निर्मितीसाठी निधी मंजूर केला आहे़ या बद्दल परभणी विधानसभा मतदार संघ व शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार डॉ. पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा शुक्रवार द़ि 24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला़. त्यावेळी परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदीवर 4 उच्च पातळी बंधारे बांधण्यासाठी जलसंपदा खात्याने मंजुरी दिली असून त्यास 1 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
      यावेळी खासदार फौजिया खान, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, अरविंद देशमुख, दिलीप ताडकळसकर, गोविंदराव काळे, बाळासाहेब ढोले, संभानाथ काळे, मारोती तिथे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते़

एफआरपीची रक्कम द्या, अन्यथा 28 सप्टेंबरला घेराव आंदोलन
परभणी,: थकविलेली संपूर्ण एफआरपीची रक्कम देण्याचे आदेश जिल्ह्यातील साखर कारखान्यांना द्यावेत, अन्यथा प्रादेशिक सहसंचालक नांदेड यांना शेतकरी घेराव घालतील, असा इशारा संतप्त शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाबरोबरच्या बैठकीतून चर्चेअंती दिला.
       शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस नांदेडचे उपसंचालक बी. एल. वांगे, विशेष लेखापरिक्षक ए. व्ही. हिवाळे, टुवेनटीवन सुगर जनरल मॅनेजर सलगर लक्ष्मी नृसिंह आमडापुर, बळीराजा साखर कारखाना पुर्णा, योगेश्‍वरी साखर कारखाना लिंबा आदी कारखान्यांच्या प्रतिनिधींसह मदनराव वाघ, परमेश्‍वर वाघ, दत्ता गडदे, हानुमान खिल्लारे, नारायण वाघ, मुंजाभाऊ शेळके, ज्ञानोबा वाघ, राम वैरागर, शिवसाम लोखंडे, विठ्ठल वाघ, संचिन वाघ, संत लोखंडे, रामराव कोळेकर यांच्यासह पोखर्णी, शिंगणापूर, सुरपिपंरी, ताडपागरी, आनंदवाडी, पेगरगवहान, तांबसवाडी, बोरवंड, कैलासवाडी, इसाद,आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS