Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोमॅटोच्या कर्मचार्‍यास लुटणार्‍या टोळीवर मोक्का

पुणे/प्रतिनिधी ः विश्रांतवाडी परिसात 17 जुलै रोजीझोमॅटो कंपनीचा एक कर्मचारी ऑर्डरचे पार्सल देऊन दुचाकीवर परतत असताना विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश दे

सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू
प्रकाश राज यांना चांद्रयान ३ची खिल्ली उडवणं पडलं महागात
गर्भपाताच्या गोळ्यांमुळे युवतीचा झाला मृत्यू. गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः विश्रांतवाडी परिसात 17 जुलै रोजीझोमॅटो कंपनीचा एक कर्मचारी ऑर्डरचे पार्सल देऊन दुचाकीवर परतत असताना विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे या टोळी प्रमुखाने व त्याच्या साथीदारांनी सदर दुचाकीला त्यांची मोटारसायकल आडवी लावून हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार केल्याचा प्रकार केला होता. अशाचप्रकारे पुढे जाऊन संबंधित टोळीने शांतीनगर भागातील दुचाकी व तीनचाकी गाडयावर धारदार शस्त्राने मारुन, तोडफोड करुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन आरडाओेरड करुन शांतीनगर भागात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणातील देवकुळे टोळीवर पोलिस आ युक्त रितेश कुमार यांनी कडक कारवाई करत मोक्कानुसार बुधवारी कारवाई केल्याची माहिती दिली आहे.
पोलिस आयुक्तांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंर्तगत ही 40 वी कारवाई आहे. टोळी प्रमुख विकांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे (वय-20, रा. बोपखेल, पुणे), कुणाल ऊर्फ साहिल बाबु पेरुमलटवय (21,रा. येरवडा, पुणे), रोहित शैलेश सदाकळे (21,रा. येरवडा, पुणे), गणेश बाबु बावधने (20,रा.खडकी,पुणे), आदित्य भारती शेडगे (20, रा.पिंपळे गुरव, पुणे) व तेजस ऊर्फ बलमा अर्जुन गायकवाड (20,रा.जुनी सांगवी,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या गुन्हयाचे तपासात टोळीप्रमुख विक्रांत देवकुळे याने आपली नव्याने टोळी तयार केली. मागील चार वर्षापासून आपल्या गुन्हेगारी कारवाया ते करत असून त्यांच्यावर प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून, नागरिकांचे मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्या टोळी सदस्यांकडून गुन्हे घडवून आणणे, दहशत निर्माण करणे, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, काम काढलेल्या आदेशाचा भंग करणे तसेच, विश्रांतवाडी भागात आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमानसात दहशत रहावी म्हणून ते गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत होते. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहे. सदर टोळी प्रमुखावर सहा गुन्हे दाखल असून त्याने संघटितपणे गुन्हेगार टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी संबंधित गुन्हे केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1), 3(2), 3 (4) नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे, पोलिस अंमलदारमनोज शिंदे, सुनील हसबे यांनी केली आहे.

COMMENTS