Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मयोगी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मोहन हाके बिनविरोध

लातूर प्रतिनिधी - येथील कर्मयोगी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पाचव्यांदा मोहन हाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कर्मयोगी शिक्षक स

 मोदी सरकारच्या काळात भारताचे उत्त्पन्न दुप्पट
हिंगोलीत मराठा समाजाच्यावतीने आमरण उपोषण
मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

लातूर प्रतिनिधी – येथील कर्मयोगी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पाचव्यांदा मोहन हाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कर्मयोगी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. नूतन संचालकाची बैठक 31 मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. शेरखाने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत चेअरमनपदी मोहन हाके तर व्हाईस चेअरमनपदी महादेव सोनवणे, सचिवपदी सुधाकर मोरे, खजिनदार म्हणून किशोर माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली व स्विकृत संचालक म्हणून शिवाजी विळेगावे व मधुकरा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस नूतन संचालक फजल काझी, राजकुमार नामवाड, भागवत बुर्ले, गणेश पांचाळ, ईस्माईल शेख, वनिता काळे, उज्वला मरेवाड , पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS