Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळा संपन्न

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्याविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखा आणि महाराष्ट्र शासनाचे पुरभिलेख संचालनालय यांच्या

पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
समृद्धी महामार्गावर 200 पेक्षा अधिक वाहनांना मनाई
श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार हा जीवनातील सर्वोच्च आनंद

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्याविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखा आणि महाराष्ट्र शासनाचे पुरभिलेख संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी, ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत येथील ऑडिटोरियममध्ये सकाळी 10 ते सायं. 5 दरम्यान कार्यशाळा संपन्न झाली. मानव्यविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखेचे संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. विषयतज्ज्ञ श्री. मनोज राजपूत (पुरभिलेखाधिकारी) यांनी भूमिका कथन केली. पहिल्या सत्रात श्री. अमोल महल्ले (संशोधक सहाय्यक) यांनी मोडी लिपी बाराखडी आणि रेघीय पद्धती याचे प्रशिक्षण दिले. 

दुसऱ्या सत्रामध्ये श्री. पंकज पाटील (वारिष्ठ डागडुजीकर) यांनी मोडी लिपीतील संक्षिप्त शब्द व त्याच्या व्याख्या याची सविस्तर माहिती दिली. श्री. गणेश खोडके (अभिलेखाधिकारी, कोल्हापूर अभिलेखागार) यांनी विविध कालगणना, महाराष्ट्रातील शासकीय व अशासकीय दफ्तरखाणे याची माहिती दिली तसेच कागदपत्रांचा कालखंड कसा ओळखावा याची माहिती दिली. 

नाशिक शहरातून जवळपास १०० हून अधिक विद्यार्थी/अभ्यासक/जिज्ञासू तसेच विद्यापीठातील कर्मचारी यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. याप्रसंगी कार्यशाळेतील सहभागींना ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ ही पुस्तिका देण्यात आली. 

पुराभिलेख संचालनायल मुंबई येथून श्री. रोहित खोले आणि श्री. नरेश जोशी हे सुद्धा उपस्थित होते. डॉ. संजय खरात यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी आभार मानले. 

सदर कार्यशाळेस मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि कुलसचिव श्री. दिलीप भरड यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS