मुंबई : आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिब
मुंबई : आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्याचे माजी लोकायुक्त एम. एल.टहलियानी यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त न्याय सहाय्यक संस्थेच्यावतीने वार्षिक राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान प्रदर्शनाचे (नॅशनल फॉरेन्सिक एक्सपो-2023) मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, न्याय सहाय्यक भौतिकशास्त्र विभागप्रमुख ना. मा. फटागरे, डॉ होमी भाभा विद्यापीठाचे अविनाश दलाल, माजी आमदार अतुल शाह यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. माजी लोकायुक्त टहलियानी म्हणाले की, पुढील काळात न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञानाला खूप महत्व असणार आहे. गुन्हेगार आपला पुरावा मागे राहू नये यासाठी प्रयत्न करत असतो. पुरावे नष्ट करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. अशा प्रकारचे गुन्हेगार शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप गरजेचे आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञान उपयोगी पडेल आणि अनेक प्रकरणांचा उलगडा होईल. न्यायवैद्यक अधिकार्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून अहवाल देताना स्पष्टता आणि पारदर्शक दिला पाहिजे. 26/11 च्या दहशतवादी हल्ला प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने फायदा झाला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा महत्वाचा दिवस असून या दिवसाची यावर्षीची संकल्पना ‘वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान’ (ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिइग) अशी आहे. न्याय व्यवस्थेत न्यायवैद्यक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आज सायबर गुन्हेगारीत वाढ होतांना दिसत आहे, असे गुन्हे घडू नयेत म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. आज बरेच लोक तंत्रज्ञानचा वापर करत आहेत. निर्भया प्रकरणामध्ये न्यायवैद्यक तंत्रज्ञानाच्या वापरमुळे फायदा झाला. तंत्रज्ञान वापरण्याबाबत नागरिकांना जागरूक केले पाहिजे, असे कुलगुरु डॉ.कामत यांनी सांगितले.
COMMENTS