हॉटेल व्यावसायिकांकडून टाळेबंदीविरोधात आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेल व्यावसायिकांकडून टाळेबंदीविरोधात आंदोलन

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, बार, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे; मात्र या निर्णयावर शहरातील अनेक व्यापारी, हॉटेल संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सुनता हूं, जबाब देने का हक मैं ने वक्त को दे रखा हैं… भुजबळांचा इशारा
सेवानिवृत्ती बद्दल मेजर रमेश नरवडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

पुणे/प्रतिनिधी : राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, बार, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे; मात्र या निर्णयावर शहरातील अनेक व्यापारी, हॉटेल संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ’युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन’या हॉटेल व्यावसायिकांच्या संघाने टाळेबंदीचा निषेध केला. 

पुण्यात मंगळवारी (दि.6) युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे मूक आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी हातात फलक घेऊन आंदोलकांनी संचारबंदीचा निषेध केला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे, सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी हे उपस्थित होते. नारंग म्हणाले, की संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेलांसाठी जेवणाची परवानगी सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत द्यावी. उत्पादन शुल्क परवाना शुल्काची संपूर्ण माफी करावी. तसेच सर्व परवानाधारक आतिथ्य व्यवसायांसाठी विद्युत दरात, औद्योगिक दरात कपात करावी. रावल म्हणाले, की आमच्या उद्योगाला लावलेल्या टाळेबंदी व निर्बंधांवर फेरविचार करावा. जेवणाच्या डिलिव्हरीसाठी परवानगी दिलेली वेळ पुरेशी नाही. त्यामुळे सरकारने आमचा विचार करून आम्हास न्याय द्यावा. युनायटेड हॉस्पिलिटी असो.च्या मागण्यांचा सर्वतोपरी विचार करून सरकारने आम्हाला दिलासा द्यावा.

COMMENTS