Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारांनी बाजार समितीला राजकीय आखाडा बनवू नये

पत्रकार परिषदेत मोहन जगताप यांचा हल्लाबोल

माजलगाव प्रतिनिधी - माजलगाव बाजार समितीचे निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळुंके यांनी त्यांच्या पुत्राला निवडणूक रिंग

टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत
Sangamner : दिवाळीच्या खरेदीसाठी संगमनेर शहरातील रस्त्यांवर गर्दीच गर्दी (Video)
अयोध्या पौळ यांनी गुलाबरावांचा समाचार घेतला

माजलगाव प्रतिनिधी – माजलगाव बाजार समितीचे निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळुंके यांनी त्यांच्या पुत्राला निवडणूक रिंगणात उभे केल्याने बाजार समितीचे सभापती पद पुत्रासाठी आमदारांनी राखीव केले का असा सवाल व्यक्त करत विरोधकांनी आमदार प्रकाश सोळुंके यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बाजार समितीच्या निवडणुका सामान्य कार्यकर्त्यासाठी असतात. परंतु या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याच्या मुंडीवर पाय देऊन आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या मुलाला निवडणुकीत उभे केले आहे.व त्याला सभापती करण्याचा त्यांचा डाव असून मतदार संघावर घराणेशाही लादणारे शेतकर्‍यांच्या हिताची असणार्‍या बाजार समितीला राजकीय आखाडा बनऊ पाहत आहेत असे उद्गगार मोहनदादा जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बाजार समिती निवडणूक उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,आमदार प्रकाश सोळंकेकडून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असल्याच्या वलग्ना केल्या जातात.मग स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी सुरक्षित असणारी सोसायटी का निवडली?या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याच्या मुंडीवर पाय देऊन त्याचा राजीनामा घेण्यात आला.पत्नीला जिल्हा परिषद पद,पुतण्याला जिल्हा परिषद पद,मुलाला बाजार समिती सभापती पद,सुनबाईला नगराध्यक्ष पद,दुसर्‍या सूनबाईला धारूरचे सभापतीपद.अशी घराणेशाही मतदारसंघात निर्माण करून आमदार प्रकाश सोळंके बाजार समितीत ही आपला राजकीय अड्डा बननू पाहत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व गटातटांना सोबत घेऊन आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत.फक्त शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी असणारी आमदार प्रकाश सोळंकेंची मत्तेदारी आम्ही उद्ध्वस्त करणार आहोत.असे ते यावेळी म्हणाले.या पत्रकार परिषदेला मनोज जगताप भास्कर कचरे संतोष यादव वसंत अलकुंटे काळे यांची उपस्थिती होती. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांने मोठे घर बांधले म्हणून आमदार प्रकाश सोळंके यांच्या पोटात दुखत आहे.याबाबत मला   प्रश्न विचारले जात आहेत.परंतु आपण काही वर्षांपूर्वी काय होता? बीड,मुंबईला जाण्यासाठी आपण एसटीचा उपयोग करत होता.मग आपल्याकडे इतक्या सार्‍या फोरचुनर गाड्या आल्या कुठून असा सवाल माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी आ.प्रकाश सोळंके यांना विचारून माझ्या कार्यकाळात बाजार समितीच्या सर्वांगीण विकास झाल्याची ग्वाही दिली.

COMMENTS