अकोले/प्रतिनिधी ः राज्याच्या राजकारणात रविवारी राजकीय भूकंप बघायला मिळाला. अजित पवारांनी बंडाचा झेंडा हाती घेत, भाजपमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा

अकोले/प्रतिनिधी ः राज्याच्या राजकारणात रविवारी राजकीय भूकंप बघायला मिळाला. अजित पवारांनी बंडाचा झेंडा हाती घेत, भाजपमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमधील अनेक आमदारांनी अजित पवारांन पाठिंबा दिला, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आमदार नीलेश लंके आणि अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी अजितदादांना पाठिंबा दिला. मात्र सोमवारी डॉ. लहामटे यांनी आपण कोणासोबतही नसून जनतेसोबत असल्याचे वक्तव्य करत संदिग्धता कायम ठेवली आहे.
आ.डॉ. किरण लहामटे यांनी सोमवारी पिंपळगाव खांड धरणाच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना आपण जनतेबरोबर असे सांगत संभ्रमावस्था वाढविली आहे. तालुक्याला आनंदाची बातमी समजणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तालुक्यातील विकास कामांना निधी मिळावा याच्या इतका दुसरा कोणताही आनंद नाही असे म्हणत दुसरीकडे ’तालुक्यातील जनता जिकडे तिकडे मी’ अशी संभ्रमावस्थेची भूमिका आ. डॉ. किरण लहामटे यांनी सद्यस्थितीत घेतल्याचे दिसत आहे. काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना अकोलेचे आ.डॉ. लहामटे हे पहिल्या रांगेत उपस्थित होते, त्यामुळे ते अजित दादांच्या सोबत असल्याचे तालुक्यातील जनतेने पाहिले होते. आज मात्र त्यांच्या भूमिकेत काहीसा बदल झाल्याचे त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसून येत होते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 46 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करत त्यांना अपात्र करावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे.
COMMENTS