Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष

काँगे्रसच्या नेत्या यशोमती ठाकुरांना मात्र धक्का

अमरावती/प्रतिनिधी ः अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या सत्ता वर्चस्वाचे राजकारण सुरू असून, या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार रवी रा

एवढा गहजब कशासाठी ?
ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी पोलीस प्रशासनाचा राहणार बंदोबस्त
दिल्ली-कोलकाता सामना पाहण्यासाठी पोहचले ऍपलचे सीईओ टीम कुक

अमरावती/प्रतिनिधी ः अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या सत्ता वर्चस्वाचे राजकारण सुरू असून, या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि काँगे्रसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यामध्ये सातत्याने वर्चस्वाची लढाई सुरू असते. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिंदे फडणवीस व पवार यांच्या युतीचा प्रभाव दिसून आला. तर, बच्चू कडू यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून अभिजीत ढेपे यांची निवड करण्यात आली.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसची एक हाती सत्ता होती. काँग्रेस मधील आजी-माजी पदाधिकारी यांनी ही सत्ता अनेक वर्षांपासून टिकून ठेवली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर या पाच वर्षाच्या टर्ममध्ये प्रत्येकाला एक वर्ष अशा पद्धतीने काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला होता. यावर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आपले उमेदवार निवडून आणले होते. एक महिनाभरापूर्वी बँकेचे अध्यक्ष प्रकाश भारसाकडे यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिला होता. त्यामुळे या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा प्रभाव या ठिकाणीही दिसून आला. आज झालेला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चांदुर रेल्वे मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप विरुद्ध शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू अशी निवडणूक रंगली होती. यामध्ये बच्चू कडू यांनी बाजी मारली.

COMMENTS