Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस ठाण्याची इमारत ही आपल्या सुरक्षितेची हमी -आ. काळे 

ग्रामीण पोलीस ठाणे व ६४ पोलीस कर्मचारी वसाहतीचे लोकार्पण कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या

आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद
साडेतीन वर्षात संपूर्ण मतदार संघाचा कायापालट होईल – आ. काळे 
साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे

ग्रामीण पोलीस ठाणे व ६४ पोलीस कर्मचारी वसाहतीचे लोकार्पण

कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या सुरक्षितेची हमी आहे. नागरिकांचा विश्वास आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा नवा अध्याय आहे. आपण सर्वांनी मिळून कोपरगावची कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करूयात असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व ६४ पोलीस कर्मचारी वसाहत इमारतीचे आणि फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. ३ रोजी उत्साहात पार पडले. यावेळी आ. आशुतोष काळे बोलत होते.

पुढे बोलताना आ. आशुतोष काळे यांनी सांगितले, पूर्वी कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका असे एकच पोलीस स्टेशन होते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण पडत होता. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून माजी आ. अशोकराव काळे  यांनी २०१३ साली तत्कालीन गृहमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळी पोलीस स्टेशन तयार केली. नवीन पोलीस स्टेशन आणि राहण्यासाठी नवीन वसाहत इमारत या दोन्ही इमारतीसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. 

 यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत इमारत उभी करण्यासाठी तत्कालीन आ. अशोकराव काळे आणि आ. आशुतोष काळे यांनी प्रयत्न केले असून आ. आशुतोष काळे यांनी स्व. अजित पवार यांच्या कडून निधीची उपलब्धता केली. 

यावेळी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, माजी आ. स्नेहलता कोल्हे, राजेश परजणे, राजेंद्र जाधव, नगराध्यक्ष पराग संधान, नितीन औताडे, काकासाहेब कोयटे, काळे कारखाना व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे, कोल्हे कारखाना चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, गौतम बँक चेअरमन संजय अगवण, संभाजी काळे, विश्वासराव महाले, अरुण येवले आदीसह पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

COMMENTS