कामाचे पैसे न दिल्याने मिस्त्रीने मर्सिडीज पेटवली

Homeताज्या बातम्यादेश

कामाचे पैसे न दिल्याने मिस्त्रीने मर्सिडीज पेटवली

१० लाख रुपयांच्या वादातून पेटवली मर्सिडीज

नोएडा प्रतिनिधी :  उत्तर प्रदेशातील नोएडातील सेक्टर-39 कोतवाली भागातील सदरपूर गावात घराबाहेर उभ्या असलेल्या मर्सिडीज कारवर पेट्रोल टाकून पेटवल्याची घ

स्वदेशी विमान ‘तेजस’ राजस्थानमध्ये कोसळले
तर राज्यात शाळांना तीन दिवस सुटी ?
अमृतसरच्या सीमेवर आढळले पाकिस्तानी ड्रोन

नोएडा प्रतिनिधी :  उत्तर प्रदेशातील नोएडातील सेक्टर-39 कोतवाली भागातील सदरपूर गावात घराबाहेर उभ्या असलेल्या मर्सिडीज कारवर पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक तपासात टाईल्स बसविणाऱ्याने १० लाख रुपयांच्या वादातून मर्सिडीजला आग लावली आहे. कामाचे पैसे न दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने कार पेटवून दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले.

COMMENTS