Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामेरीच्या कु. सृष्टी पाटील हिची एनडीए मध्ये निवड

इस्लामपूर / प्रतिनिधी : कर्मवीर शिक्षण संस्था कामेरीच्या सुनंदा जाधव कन्या ज्युनियर कॉलेज कामेरीची विद्यार्थिनी कु. सृष्टी सतीश पाटील हिने केंद्र

अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी पालिका प्रथम: स्वच्छता पुरस्कारात पांचगणी नगरपरिषदेची मांदियाळी
कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात

इस्लामपूर / प्रतिनिधी : कर्मवीर शिक्षण संस्था कामेरीच्या सुनंदा जाधव कन्या ज्युनियर कॉलेज कामेरीची विद्यार्थिनी कु. सृष्टी सतीश पाटील हिने केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून एनडीएमध्ये यश संपादन केले. इयत्ता बारावी (कला शाखा) नंतर तिने ही परीक्षा दिली. एनडीएमध्ये सांगली जिल्ह्यातून एनडीएसाठी मुलींमधून प्रवेश मिळविणारी कु. सृष्टी पाटील ही पहिली विद्यार्थिनी आहे.
पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने कामेरी येथील कर्मवीर शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये पूर्ण केले. तिच्या या यशाबद्दल कामेरीच्या सर्व परिसरामध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील या मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रा. अनिल पाटील, अध्यक्ष भगवान कदम, उपाध्यक्ष कुणाल पाटील, विलास बारपटे, वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस सौ. छाया पाटील, संस्थेचे सहसचिव वैभव पाटील, अतुल कदम, संजय जाधव यांनी तिचे अभिनंदन केले. तिला कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. शैला पाटील, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख प्रा. संजय पाटील, प्रा. सुधीर खंडागळे, प्रा. सौ भारती पाटील, प्रा. सौ. सारिका पाटील, शाळेचे सर्व शिक्षक व आई-वडीलांचे मार्गदर्शन लाभले. कला शाखेमधून आपण एनडीए सारख्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवू शकतो, हा आदर्श कु. सृष्टी पाटील हिने ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समोर ठेवला आहे.

COMMENTS