Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार

लातूर प्रतिनिधी - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे घडली. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल क

ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ ची विश्ववारी
चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर कालवश

लातूर प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे घडली. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, नांदुर्गा येथील एका दहा वर्षीय मुलगी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिकवणीला जाताना मुकेश अंबाजी बनसोडे (वय 33) याने अत्याचार केले. पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतनजीक असलेल्या रिकाम्या गोदामात अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितले तर खल्लास करतो, अशी धमकी दिली. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कलम 376 (2) (एन) भादंवि, 4, 6, 8, 12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक ढोणे करत आहेत.

COMMENTS