Homeताज्या बातम्याशहरं

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

मारेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

यवतमाळ प्रतिनिधी -  बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील पालक बालवयात मुलींचे विवाह लावून देत असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे. य

कुपवाडामध्ये हिमस्खलनात तीन जवानांना वीरमरण
राज्यात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता
कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस

यवतमाळ प्रतिनिधी –  बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील पालक बालवयात मुलींचे विवाह लावून देत असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे बालविवाह केल्याने बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस येताच मारेगाव पोलिस ठाण्यात पतीसह पीडित मुलीच्या आईविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आल आहे. त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.

COMMENTS