Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्डा शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलिसांनी आरोपीला केली तात्काळ अटक

जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील खर्डा शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. गुन्हा दाखल होताच खर्डा पोलिसांकडून तातडीने आरोपीला अटक करण्या

अक्षदा मंगल कलशाचे राजूरमध्ये स्वागत
कर्जत नगरपंचायतीतील एक प्रभाग ठरला कळीचा; निवडणूक रद्द करण्याची भाजपची मागणी
पाठलाग करून हनीट्रॅपचा आरोपी जेरबंद

जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील खर्डा शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. गुन्हा दाखल होताच खर्डा पोलिसांकडून तातडीने आरोपीला अटक करण्यात आली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, या घटनेतील अल्पवयीन पिडीता ही कॉलेज सुटल्यानंतर पायी चालत घरी जात असताना आरोपी रोहित विनोद डाडर रा.अण्णाभाऊ साठे चौक, खर्डा हा तिचे पाठीमागे पायी चालत येऊन पिडीतेस डोळ्याने इशारा करून निघून गेला होता. तसेच पिडीता ही भाजीपाला खरेदी करणे करिता गावातील बाजारात जात असताना पाठीमागे चालत जाऊन पिच्छा करत घरासमोर आल्यानंतर पिडीतेला इशारा करून तुझे फोटो माझ्याकडे आहेत. तू माझ्यासोबत बोलली नाही तर ते मी व्हायरल करील अशी धमकी दिली आहे. यानुसार पिडीतेच्या फिर्यादीवरून रोहित विनोद डाडर याचे विरुध्द गुन्हा रजि.नं. 70/2023 भादवि. कलम 354(ड), 506, पोक्सो कलम 11 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तातडीने अटक करण्यात आली आहे.  हा प्रकार दि. 27 जून 2022 रोजी दुपारी 12 : 30 ते व 23 मार्च 2023 रोजीचे दुपारी 1: 00 वाजताचे सुमारास खर्डा गावामध्ये घडला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या नेतृत्वाखाली पोना संभाजी शेंडे, करत आहेत. आरोपीला अटक पोकाँ शेषराव मस्के, पोकाँ खाडे, पोकाँ बडे महिला पोकाँ पोकळे यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS