विकासाचा ‘संगमनेर पॅटर्न’ महाराष्ट्रालाही अनुकरणीय – आमदार थोपटे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासाचा ‘संगमनेर पॅटर्न’ महाराष्ट्रालाही अनुकरणीय – आमदार थोपटे

संगमनेर/प्रतिनिधी :  चांगले नेतृत्व मिळाले कि त्या विभागाचा चांगला विकास होतो हे संगमनेर तालुका मूर्तिमंत उदाहरण आहे .दुष्काळी तालुका ते राज्यातील प्

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नक्षलवाद्यांनी घेतली उडी l पहा LokNews24
केडगाव उपनगरातून हळद फिटण्या अगोदर नववधू पसार
सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे

संगमनेर/प्रतिनिधी :  चांगले नेतृत्व मिळाले कि त्या विभागाचा चांगला विकास होतो हे संगमनेर तालुका मूर्तिमंत उदाहरण आहे .दुष्काळी तालुका ते राज्यातील प्रगतशील तालुका हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच  शक्य झाले आहे. सर्व क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संगमनेरच्या ‘विकासाचा पॅटर्न’ हा महाराष्ट्राला अनुकरणीय ठरत असल्याचे प्रतिपादन भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे..

 संगमनेर शहरात नगरपालिकेच्या वतीने रंगार गल्ली व सय्यद बाबा चौक येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार सुनील केदार, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड ,सौ सुनंदाताई दिघे, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, डॉ. दानीश शेख ,किशोर पवार, उपनगराध्यक्ष इब्राहिम देशमुख, किशोर टोकसे, गजेंद्र अभंग, सिताराम दीडडी, जयवंत पवार, सोमेश्वर दिवटे ,निखिल पापडेजा, गौरव डोंगरे ,सुभाष सांगळे, लाला व्यापारी, शकील पेंटर, असिफ तांबोळी, मुन्ना शेख, हैदर अली मुख्याधिकारी राहुल वाघ शफी तांबोळी आदी उपस्थित होते .

याप्रसंगी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, संगमनेर तालुका व भोर तालुक्याचे जुने ऋणानुबंध राहिले आहेत. या तालुक्याने विकासातून केलेली वाटचाल ही सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहे .महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाच्या पोहोचवताना संगमनेर शहरातील नागरिकांसाठी निळवंडे धरणातून थेट पाइपलाइन योजना आणली. त्यामुळे येथे मुबलक स्वच्छ पाणी मिळत आहे. तसेच जिल्हास्तरीय वैभवशाली इमारती उभ्या राहिले आहेत. सामाजिक व सांस्कृतिक  वातावरणासह येथील बाजारपेठ व विविध क्षेत्रातील विकास हा पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला अनुकरणीय ठरला आहे.

 तर नामदार केदार म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल शहर ठरले आहे. शहरात उभे राहिलेले बस स्थानक हे जणू एअरपोर्ट भासत आहे .कोरोणा संकटातही विकासकामांचा वेग कायम राखताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य माणसाची कायम काळजी घेतली आहे. नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी हरित संगमनेर संगमनेर साठी केलेले काम तर सर्वांसाठी अत्यंत मार्गदर्शन करणारे ठरले आहे. आमदार डॉ तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक वातावरणात ते चांगले असून विकासातून वैभवाकडे या शहराची वाटचाल सुरू आहे. विकासाच्या योजना सातत्याने राबविले जात आहे आगामी काळामध्ये गटारीतील पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबून या संपूर्ण पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी काम केले जाणार आहे . तर नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की संगमनेर शहरातील सुजाण नागरिकांच्या व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यातून संगमनेर शहरात प्रगतीकडे गेले आहे. यामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा राहिला असला तर नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ तांबे यांचे सातत्याने मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. यावेळी शहरातील विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..



 नामदार थोरात हे महाविकास आघाडीचे शिल्पकार

शिवसेना ,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सरकार करतील हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र अत्यंत अडचणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करणारे नामदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार बनवण्यात अत्यंत मोलाचा वाटा उचलला असून तेच महा विकास आघाडीचे शिल्पकार असल्याचे म्हटले आहे

COMMENTS