Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले त्र्यंबक राजाचे दर्शन

नाशिक प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महामृत्युंजय त्र्यंबक राजाचे विधिवत दर्शन घेतले. श्

मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला
नवीन मक्याचे वाण देते १००-१०५ दिवसांत बंपर उत्पादन
जायकवाडी धरणात केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक

नाशिक प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महामृत्युंजय त्र्यंबक राजाचे विधिवत दर्शन घेतले. श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर नगरीत आगमन झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या हस्ते रुद्राभिषेक पूजन करण्यात आले. पौरहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे अलोक लोहगावकर सुयोग वाडेकर बाळासाहेब  कळमकर ऋषिकेश देवकुटे, रवींद्र अग्निहोत्री यांनी केले. कुशावर्त तीर्थ येथे गोदावरीची आरती दररोज व्हावी यासाठी शासनाकडून नियोजन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त कैलास घुले मनोज थेटे स्वप्निल शेलार पुरुषोत्तम कडलक प्रशासक देवचक्के आदींनी स्वागत केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे आमदार हिरामण खोसकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव प्रशांत जाधव तहसीलदार श्रेया संचेती,वन खात्याचे अधिकारी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर भाजपाचे पदाधिकारी सुयोग वाडेकर श्रीकांत गायधनी प्रशांत बागडे संतोष भुजंग रवींद्र सोनवणे, संपतराव सकाळे पंकज धारणे भावेश शिखरे सचिन शुक्ल सागर उजे गोपाळ झुंबड बंडू आहेर पांडुरंग कोरडे अलोक लोहगावकर शिवम लोहगावकर महिला आघाडीच्या स्नेहल भालेराव वैष्णवी वाडेकर नीलिमाधारणे सुवर्णा वाडेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS