Homeताज्या बातम्यादेश

नागरी सेवाविषयक क्षमतांचा मंत्री सिंह यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली : केंद्रीय कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे, क्षमता निर्मिती आयो

पुण्याच्या विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘स्वामी कुवलयानंद योग पुरस्कारां’चे वितरण

नवी दिल्ली : केंद्रीय कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे, क्षमता निर्मिती आयोगाचे (सीबीसी) मनुष्यबळविषयक सदस्य डॉ.आर.बालसुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत, कर्मयोगी अभियान या नागरी सेवाविषयक क्षमता निर्मितीसाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सध्या केंद्र सरकारचे 31 लाख कर्मचारी कर्मयोगी अभियानाअंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत ही बाब त्यांनी ठळकपणे मांडली. मंडळामधील प्रशिक्षणाचा दर्जा प्रमाणित करण्यात आणि त्यात सुसंवाद राखण्यात नागरी सेवा प्रशिक्षण संस्था (सीएसटीआयएस) बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर त्यांनी अधिक भर दिला.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय प्रमाणकांची (एनएससीटीआय) पद्धत सुरु करणे हा संस्थात्मक पातळीवर क्षमता निर्मितीच्या पद्धती निश्‍चित तसेच प्रमाणित करण्यासाठीचा पथदर्शी प्रयत्न ठरला आहे. आतापर्यंत देशातील 300 संस्थांनी या उपक्रमाअंतर्गत नोंदणी केली आहे अशी माहिती यावेळी केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली. या प्रयत्नांच्या अनुषंगाने, क्षमता निर्मिती आयोग यावर्षी 12 ऑगस्ट रोजी डॉ.जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांचे अधिवेशन भरवणार आहे. देशातील सुमारे दीडशे नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांना एनएससीटीआय मानकांवर आधारित मान्यता प्रदान करणे तसेच 300 नोंदणीकृत संस्थांना मान्यता प्रमाणपत्रे वितरीत करणे या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सीएसटीआयएस ना मान्यता प्रक्रियेविषयी आणि त्यासाठीच्या निकषांविषयी माहिती देण्यावर देखील या कार्यक्रमात अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. एकात्मिक सरकारी ऑनलाइन प्रशिक्षण (आयजीओटी) मंचावर प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या डिजिटलीकरणाला चालना देणे तसेच प्रशिक्षण साहित्याची डिजिटल उपलब्धता विस्तारण्यासाठी आगामी उपक्रमांचे  नियोजन करणे ही या अधिवेशनाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. सीएसआयटीएसमधील प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयजीओटी मंचासाठी डिजिटलीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या संस्थांमध्येच क्षमता विकसित करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. यावेळी सीएसटीआयएस साठी मान्यता-पश्‍चात गुणवत्ता सुधारणा योजने (क्यूआयपी) संदर्भात एक माहिती सत्र देखील घेण्यात येणार आहे.

COMMENTS