एम आय एम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांना आघाडीसाठी दिलेला प्रस्ताव हा आता वादग्रस्त ठरला आहे. यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिय
एम आय एम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांना आघाडीसाठी दिलेला प्रस्ताव हा आता वादग्रस्त ठरला आहे. यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्यामार्फत एम आय एम चा हा प्रस्ताव म्हणजे भाजपची एक चाल आहे किंवा कटाचा भाग आहे असा थेट आरोप केला आहे. अर्थात एमआयएम या पक्षाचे जर आपण स्वरूप समजून घेतलं तर वेळोवेळी या पक्षावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप का होतो, असा प्रश्न निश्चितपणे पडायला लागतो. कोणताही आरोप शून्य संदर्भात कधीही होत नसतो. जनमाणसात काही संदर्भ उभे राहिल्याशिवाय कोणताही आरोप जन्माला येत नाही. अर्थात संघ शिकवणीत तयार झालेली माणसे म्हटली म्हणजे खोटेनाटे आरोपही सत्य ठरवू शकतात, हे एक वेगळे वास्तव देखील असू शकते. मात्र एमआयएम या पक्षावर होणारा या आरोपाच्या संदर्भात बोलत असताना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी या प्रस्तावावर थेट नकार दिला नसला तरी शिवसेनेने जाहीर केलेली भूमिका म्हणजे एमआयएमच्या प्रस्तावावर नकार आहे. अर्थात मुस्लिम समुदाय ही वोट बँक नजरेसमोर ठेवून एम आय एम पक्षाची घोडदौड देशात सुरू झाली. मात्र, तत्पूर्वी आपणाला या सगळ्या संदर्भांना समजून घेण्यासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची म्हणून समजून घ्यावी लागेल. काँग्रेस हा पक्ष स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणारा पक्ष असला आणि या पक्षाच्या भूमिकेशी संघाचे विचार विरोधात असले तरीही ब्राह्मण समुदायाची शक्ती म्हणून देखील याच पक्षाचा उपयोग संघाने करून घेतलेला आहे आणि लोकशाही व्यवस्थेत धर्म व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संघशक्ती ला काँग्रेसच्या सत्तेचा नेहमीच उपयोग झाला आहे, हे सत्य नाकारता येत नाही. मात्र ही संधी घेत असताना त्याचवेळी कडव्या संघ विचारांचा राजकीय पक्ष सत्तेवर यावा, हा प्रयत्न देखील संघाने कधीही कमकुवत होऊ दिला नाही; त्यामुळे काँग्रेसची शक्ती कमकुवत करणं, तिला जर्जर करणं आणि शेवटी काँग्रेसला त्याच्या मुळासकट काढून टाकणं ही ध्येयधोरणे ही संघाची आहेत, असे आता मान्य करावयास हरकत नाही. काँग्रेसला जर शक्ती म्हणून कमकुवत करायचे असेल किंवा सत्तेतून बाहेर करायचे असेल तर काँग्रेसच्या मागे असणारी सर्वात मोठी शक्ती मतदार म्हणून दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम किंवा धार्मिक अल्पसंख्यांक या शक्तींचा सेक्युलर च्या नावाखाली काँग्रेसला सपोर्ट मिळत होता, तोच संपवायचा असेल तर या शक्तींना काँग्रेसपासून वेगळे करणे, हा संघाच्या समोर महत्त्वपूर्ण पर्याय होता; त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ याची सूत्रे आखत देशामध्ये काही राजकीय पक्ष जन्माला घातले, त्यातच, एम आय एम चा देखील जन्म आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे देशात आदिवासी बहुल भागातच आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आरक्षणाच्या माध्यमातून संसद आणि विधिमंडळात निवडून जातात, अशा प्रदेशात देखील आदिवासी पक्ष संघटनांना आकार देण्याची भूमिका किंवा योजना संघाने आखल्याचे दिसते आणि त्याला काही भागांमध्ये व्यवहाराचे रूपही आलेले दिसते. त्यात काही नेत्यांचा उदय झालेला दिसतो आणि त्यात संघाला काही प्रमाणात यशही आल्याचे दिसते. अशाप्रकारे देशात काँग्रेसच्या मागिल धार्मिक अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि मंडल आयोगाच्या नंतर रामजन्मभूमी ला महत्व देणारा ओबीसी समुदाय यांना धार्मिक भावनेत अडकवण्यात संघाला जे यश मिळाले त्यातच आज संघाची राजकीय ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढण्याची बिजे आपल्याला दिसतात. म्हणून अशा वेळी संघाच्या योजनाबद्ध प्रयोगातून निर्माण झालेले राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर सातत्याने जो आरोप होतो तो म्हणजे भाजपची बी टीम असण्याचा जो आरोप होतो तो तत्थ्यहीन आहे, असेही थेट म्हणता येत नाही. त्यामुळे, एमआयएम चे इम्तियाज जलिल यांनी दिलेला आघाडीचा प्रस्ताव हा भाजपच्या कटाचा भाग आहे, असा आरोप शिवसेनेकडून लावण्यात आला यात तथ्य नाही, असेही थेट म्हणता येऊ शकत नाही!
COMMENTS