Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या संपर्कात ?

आमदार संजय शिरसाठ यांचा दावा

मुंबई ः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृ

रणबीर कपूर आणि विकी कौशल मध्ये स्पर्धा
मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा
राज्यात आरक्षण प्रश्‍नांवर स्फोटक परिस्थिती

मुंबई ः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात बसल्याचे आढळून आलं. यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असताना नार्वेकर हे आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
 विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मिलिंद नार्वेकरांनी सभागृहात जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली असेल. पण अनेक वर्षांपासून त्यांची आमदार व्हायची इच्छा आहे. त्यामुळे ते आता मार्ग शोधत आहेत. आमच्या माहितीनुसार उद्धव ठाकरेदेखील त्यांना आता जवळचे मानत नाहीत. ते कदाचित लवकरच सभागृहात येतील, असा त्यांचा प्रयत्न आहे. मिलिंद नार्वेकर आणि इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, काल विरोधकांनी वर्षा बंगल्यावरील चहा-पाण्याच्या खर्चावरून शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेलाही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. या खर्चाची आम्हाला जाणीव आहे. परंतू भेटायला येणारा कार्यकर्ता, शेतकरी, राज्यातील सामान्य नागरीक हा चहा-पाण्याशिवाय जाऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. यात काहीही वावगं नाही, असे ते म्हणाले. तसेच आधीचे मुख्यमंत्री आमदारांना भेटतच नव्हते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा प्रश्‍नच नव्हता. म्हणून त्यांचा खर्चही कमी होता, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

COMMENTS