Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जत तालुक्यासाठी ’एमआयडीसी’

उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

सांगली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील नागरिकांची खदखद बाहेर पडत असून, विकासकामे करून, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करा, शे

म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही ‘ अशी परिस्थिती महाविकास आघाडीची.
आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.
ठाकरे गटाचे 12 ते 13 आमदार संपर्कात

सांगली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागातील नागरिकांची खदखद बाहेर पडत असून, विकासकामे करून, पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करा, शेजारी राज्यांमध्ये सहभागी होण्याचा इशाराच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांनी दिला होता. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून, जत तालुक्यातल्या सीमावर्ती भागातल्या गावांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ’एमआयडीसी’ची घोषणा केली. त्यामुळे सीमावर्ती भागातील रोजगारांचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.


उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी जत तालुक्यातल्या गावांसाठी ’एमआयडीसी’ स्थापन करणार असल्याची घोषणा केली. सामंत म्हणाले की, जत तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळत नाही. त्यांची ही समस्या लवकरात लवकर सोडवू. शिवाय तालुक्यात शंभर हेक्टरच्या परिसरात ’एमआयडीसी’ची उभारणा करू. त्यासाठी आठ दिवसांत मुंबईत बैठक घेऊ. सीमाप्रश्‍नी सामंत म्हणाले की, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तिथे आम्ही सरकारची बाजू मांडू. मात्र, सध्या सुरू असलेल्या अनेक गोष्टी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दृष्टीनेही योग्य नाहीत. महाराष्ट्रातली जनता संयमी आहे. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री चर्चा करतील. दोन्ही राज्यात वादळ निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊ. सामंत पुढे म्हणाले की, आचारसंहिता संपली की पुन्हा येईन. लोकांशी चर्चा करेन. मुख्यमंत्री सुद्धा येतील. जत तालुक्यात दोन जमिनी आहेत. त्यावर उद्योगनगरी उभारा. 24 एकर जमीन पिकवा, अशी ऑफर देखील सांमत यांनी यावेळी दिली.

सरकारची डोकेदुखी वाढली – सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील लोकांसमोर पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. यातून मार्ग निघावा म्हणून त्यांनी राज्य सरकारला कर्नाटकात जायचा इशारा दिला. शिवाय नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातल्या गावांनीही स्थानिक प्रश्‍न न सुटल्यामुळे कर्नाटकात जाऊ, अशी धमकी दिलीय. तर पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा कर्नाटकात जाऊ, असा इशारा पंढरीच्या रहिवाशांनी दिला. त्यामुळे नागरिकांचे न सुटलेले प्रश्‍न आता सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय.

मंत्र्यांचा आजचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता – कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्‍नी राज्य सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपावली आहे. त्यानुसार या 2 मंत्र्यांचा आज 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौरा नियोजित आहे. मात्र, हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विनाकराण यासंदर्भात नवे वाद सुरु करणे चुकीचे आहे. उद्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाणासाठी होता. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापसून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद तयार करायचा का? हा महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात विचार करुन मुख्यमंत्री अंतिम निर्णय देतील.

COMMENTS