Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाने घरांसाठी नियम केले शिथील

मुंबई ः मुंबईत घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र कधी-कधी कागदपत्रांच्या जंजाळामुळे स्वस्तात मिळणारे म्हडाची घरेही घेता येत नाहीत. मात्र म्हड

जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ यांना मन की बात कार्यक्रमाचे निमंत्रण
ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुधारणा विधेयकाला मंजुरी
आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलाने बापाचा घेतला जीव.

मुंबई ः मुंबईत घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र कधी-कधी कागदपत्रांच्या जंजाळामुळे स्वस्तात मिळणारे म्हडाची घरेही घेता येत नाहीत. मात्र म्हडाने मुंबई लगतच्या दोन शहरांमध्ये घरांसाठी नियम शिथील केले आहेत. मुंबई लगतच्या विरार-बोळिंजमध्ये तयार असलेल्या घरांच्या विक्रीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ने आपल्या नियमांत पहिल्यांदा बदल केले आहेत.
नव्या नियमानुसार आता कोणताही अर्जदार केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडून विरार बोळिंजमधील घर मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो. विरारमधील घरांसाठी म्हाडाने नियम बदलले आहेत. विरारमध्ये घरे तयार होऊन अनेक वर्षे झाली आणि याच्या विक्रीसाठी अनेक प्रयत्न करुनही या भागातील घरे पडून असल्याने म्हाडाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. म्हाडाच्या लॉटरीत घर मिळवण्यासाठी अर्जासोबत अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. यात पॅन कार्ड,आधार कार्डसोबतच डोमासाइल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला,प्रतिज्ञापत्र, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, त्याचबरोबर राखीव कोट्यातील घरांसाठी अन्य प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. या नियमात बदल करत आता विरारमध्ये घर घ्यायचे असलेल्यास केवळ दोन कागदपत्रे पुरेशी आहेत. विरार परिसरात म्हाडाची जवळपास 5 हजार घरे तयार आहेत. म्हाडा कोकण बोर्डाने या घरांसाठी अनेकदा सोडत काढली. मात्र तरीही या घरांची विक्री झेली नाही. म्हाडाने विरारमधील घरांसाठी प्रथम येणार्‍यास प्राधान्य, ही योजनादेखील सुरू केली होती. मात्र ही योजनादेखील चालली नाही. विरारमधील बोळिंजच्या प्रोजेक्टमध्ये वन आणि टुबीएचके फ्लॅट आहेत. वन बीएचके फ्लॅटची किंमत जवळपास 23 लाख रुपये आणि टु बीएचके फ्लॅटची किंमत जवळपास 44 लाख रुपये आहे.

COMMENTS